पॉलिसीबाजार IPO ऑन टॉप, सबस्क्रिप्शन साठी गुंतवणूकदारांची गर्दी – वाचा सविस्तर

PB Fintech has built India's largest online platform for insurance (Policybazaar) and lending products (Paisabazaar).

पॉलिसीबझार आणि पैसाबाजार हे प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या PB फिनटेकच्या पब्लिक इश्यूला 1 नोव्हेंबर रोजी 3.45 कोटी इक्विटी शेअर्सच्या ऑफर साइजनुसार 90.85 लाख इक्विटी शेअर्ससाठी बोली लागल्याने, IPO ला 54 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले.

रिटेल गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी राखीव असलेल्या भागाच्या तुलनेत 95 टक्के शेअर्ससाठी बोली लावली आहे.

गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या भागासाठी 3 टक्के आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 16 टक्के बोली लागली.

इन्शुरन्स एग्रीगेटर फर्म पॉलिसीबाझारने IPO द्वारे 5,700 कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, ज्यामध्ये 3,750 कोटींचा फ्रेश इश्यू आणि SVF पायथन II (केमन) सह इतर स्टेकहोल्डर मिळून 1,960 कोटींची OFS यांचा समावेश आहे.

के.आर.चोक्सी म्हणाले, “आम्हाला कंपनीच्या वाढीवर लक्ष केंद्रित करणे, विविध प्रयोग करणे, मुख्य व्यवसाय, आंतरराष्ट्रीय विस्तार करणे हे ध्येय आहेत.” ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत पॉलिसीबझारने सुमारे 400 मिलियन डॉलर उभारले आहेत.

ब्रोकरेजनुसार, डिजीटल इकोसिस्टममधील पॉलिसीबाजारचे अनेक ग्रोथ ड्रायव्हर्स आणि सध्याचे स्थान लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी IPO मध्ये लिस्टिंगसाठी तसेच दीर्घकालीन फायद्यासाठी गुंतवणूक करावी.

पॉलिसीबझारच्या महसुलात सरासरी 34 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. फर्मचा वाढता आलेख हा गुंतवणूकदारासाठी फायदेशीर ठरू शकतो.

कंपनी कमिशन आणि अतिरिक्त सेवांमधून, विमा कंपन्या तसेच कर्ज देणार्‍या फर्मना ऑनलाइन मार्केटिंग, सल्ला आणि टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देऊन महसूल मिळवते.

PB फिनटेकने पॉलिसीबझार आणि पैसाबझार हे भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केले आहेत.

फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग ब्रँड्सची विसिबिलीटी आणि जागरूकता वाढवण्यासाठी 1,500 कोटी, ऑफलाइन ग्राहक क्षमतेसाठी 375 कोटी , धोरणात्मक गुंतवणूक आणि अधिग्रहण यासाठी 1,500 कोटी तर उर्वरित रक्कम फर्म विस्तार करण्यासाठी वापरली जाईल.

Comments are closed.