कमोडिटी स्टॉक्सवर वर बेट लावताय तर हे पाच स्टॉक्स जॉकी म्हणून निवडू शकता 

Commodity stocks will benefit from Government's focus on Infrastructure

जगभरातल्या सगळ्याच स्टॉक एक्सचेंजवर सध्या कमोडिटी स्टॉक्सची चलती आहे. गेल्या काही महिन्यांत या स्टॉक्स चांगली कामगिरी केली आहे. असे असले तरी तज्ज्ञांच्या मते हे कमोडिटी सायकल आत्ता कुठे सुरु झाले आहे. विविध देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आखलेली धोरणे, इन्फ्रास्ट्रक्चरवरवर दिलेला अधिकचा भर ही याची कारणे आहेत. भारतामध्येदेखील टाटा स्टील, हिंदाल्को, ओएनजीसी, रिलायन्स, वेदांता, टाटा केमिकल, युपीएल, जेएसडब्यू स्टील एसीसी, अल्ट्राटेक सिमेंट यांसारख्या कमोडिटी शेअर्सने चांगली कामगिरी केली आहे. येणाऱ्या काळात खालील कंपन्यांचे स्टॉक चांगली कामगिरी करू शकतात.

 

१. एनएमडीसी – या स्टॉकने २०२१ मध्ये जवळपास १०० ते २०० एवढी मोठी रॅली दिली आहे. सध्या स्टॉक १८१ रुपयांवर आहे. कंपनीने आता स्टील मेकिंगमध्ये प्रवेश केला आहे. आपली मार्केट लिडर ही पोझिशन राखण्यासाठी कंपनीने बरेच नवे प्रोजेक्ट्स हाती घेतले आहेत. भारत सरकारकडूनसुद्धा स्टीलचे प्रॉडक्शन वाढवण्यासाठी धोरणे आखली जात आहेत. याचा फायदा एनएमडीसीला होऊ शकतो. झारखंड आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये कंपनीकडून काही नवे म्हणजेच ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट्स सुरु करण्यात येतील.

२. गुजरात गॅस – गेल्या एक वर्षात हा स्टॉक २४० रुपयांवरून ५१५ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. फक्त २०२१ मध्ये या स्टॉकने जवळपास १२० पॉईंट्सची रॅली दिली आहे. येणाऱ्या काळात केंद्र सरकारकडून सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येणार आहे. काही राज्यांमध्ये याचे काम सुरूदेखील झाले आहे. तसेच २०२४ पर्यंत भारताचे नॅचरल गॅस प्रॉडक्शन ५२% वाढेल असा अंदाज आहे. कृष्णा गोदावरी म्हणजेच केजी बेसीनमधून होणारे गॅस प्रॉडक्शन डिसेंबर २०२० पासून वाढले आहे. याचा सकारात्मक परिणाम या शेअरवर होऊ शकतो.

३. रेन इंडस्ट्रीज – या कंपनीबद्दल आम्ही काही दिवसांपूर्वी सविस्तर माहिती दिली होती. कंपनी कार्बन, ऍडव्हान्स मटेरियल्स आणि सिमेंटचे प्रॉडक्शन करते. कंपनीच्या सिमेंट सेगमेंटने चांगली कामगिरी करत नफ्यात वाटा उचलला आहे. ऍडव्हान्स मटेरियल सेगमेंटमध्ये कंपनीने काही नवे प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत. याचाही कंपनीला फायदा होऊ शकतो. कंपनीने २०२१ आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत २०६ कोटींचा नफा नोंदवला. तसेच कंपनीचे डेटदेखील कमी होत आहे. गेल्या वर्षभरात कंपनीने ६५ रुपयांपासून ते १८५ रुपयांपर्यंत एवढी जोरदार रॅली नोंदवली आहे.

४. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) – भारतामधील स्टीलच्या वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. कंपनीच्या स्टॉकने गेल्या वर्षभरात २९ रुपयांपासून १४५ रुपयांपर्यंत मजल मारली आहे. २०२१ मध्येही स्टॉकने जवळपास ९०-९५% ची रॅली दिली आहे. भारताची अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येते आहे. सरकारकडून येणाऱ्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात स्टीलची गरज लागणार आहे. याचाच फायदा सेलला होऊ शकतो.

५. हिंद कॉपर – येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक व्हेइकल्स, सोलर एनर्जी, बॅटरीज, विंड एनर्जी या क्षेत्रातून कॉपरला मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे. जगभरातील कॉपरची एकूण मागणी २०३० पर्यंत ६०० ते ९००% ने वाढू शकते असे गोल्डमन सॅक्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. याचा फायदा हिंद कॉपर या स्टॉकला होऊ शकतो. कंपनीच्या भारतातील झारखंड, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये कॉपरच्या खाणी आहेत. या खाणींमधील कॉपरचे प्रॉडक्शन कंपनी वाढवते आहे. मार्च २०२० मध्ये ५१४ कोटी रुपये तोटा ते डिसेंबर २०२० मध्ये १०८ कोटींचा नफा अशी चांगली कामगिरी कंपनीने केली आहे. कॉपरच्या वाढत्या मागणीचा परिणाम कंपनीच्या शेअरवरसुद्धा झाला आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या १ वर्षात ३९० रुपयांपासून ते १८५ रुपयांपर्यंत मजल मारली. कॉपरच्या वाढत्या मागणीचा कंपनीला अजूनही बराच फायदा होऊ शकतो.

Comments are closed.