‘ ह्या ‘ IT फर्मचा Q2 रिझल्ट जाहीर, नफ्याने ओलांडली तब्बल 49% इतकी पातळी
Birlasoft Q2 net profit surges 49.2% to Rs 103.1 crore
IT फर्म बिर्लासॉफ्टने मंगळवारी सप्टेंबर 2021च्या तिमाहीत नेट प्रॉफिटमध्ये 49.2 टक्क्यांनी वाढ करून एकूण 103.1 कोटी रुपयांची नोंद केली.
कंपनीने जुलै-सप्टेंबर 2020 या कालावधीत 69.1 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, असे बिर्लासॉफ्टने फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
ऑपरेशन्समधील महसूल 18 टक्क्यांनी वाढून 1,011.7 कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वी रु. 857.5 कोटी होता.
या तिमाहीत, बिर्लासॉफ्टने सर्व कर्मचार्यांसाठी पगारवाढ केली आहे. कॅलेंडर वर्षातील ही दुसरी पगारवाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.
कंपनीने प्रति शेअर 1.50 रुपये डिविदेंड जाहीर केला आहे, असे त्यांनी नमूद केले.
कपूर म्हणाले की, बाजारातील मागणीत वाढ झाल्यामुळे कंपनी भरपूर मजबूत झाली आहे.
कंपनीचे सीईओ म्हटले, “आमचे ग्राहक 20 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.या तिमाहीत, आम्ही आमच्या सर्व इंडस्ट्री वर्टिकल आणि सर्व्हिस लाइन्समध्ये ट्रॅक्शन वाढ पाहिली आहे.
बिर्लासॉफ्टने या तिमाहीत TCV मध्ये 140 मिलियन USD चा करार केला. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीचा हेडकाउन्ट 12,065 होता, जो जून 2021 तिमाहीत 11,508 होता.
कपूर म्हणाले की, कंपनी अॅट्रिशनवर मोठया प्रमाणात काम करत आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात एंट्री-लेव्हल इंजिनीअर्सची नियुक्ती करण्याचा विचार केला आहे.
या आर्थिक वर्षात 15 टक्के ते 20 टक्के हेडकाउंट वाढ करण्याचे कंपनीचे लक्ष आहे.
डॉलरच्या बाबतीत, कंपनीचा नेट प्रॉफिट 49.8 टक्क्यांनी वाढून 14 मिलियन USD झाला, तर महसूल 18.4 टक्क्यांनी वाढून सप्टेंबर 2021 तिमाहीत 136.9 मिलियन USD झाला आहे.
कंपनीचे शेअर्स BSE वर प्रत्येकी 406.25 रुपयांवर स्थिरावले.
Comments are closed.