EV युगात BPCLचा वाटा, करणार एकदम 1000 चार्जिंग स्टेशनचा साठा

BPCL plans to build 1,000 EV charging stations

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) 1,000 इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे.

बीपीसीएलचे अध्यक्ष अरुण कुमार सिंह म्हणाले की, कंपनी व्यवसायाच्या नवीन संधी आणि “ऑटो फ्यूलसाठी पर्याय उभारत आहे”.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी 19,000 आउटलेटच्या नेटवर्कमधून 7,000 पेट्रोल पंपावर ही सुविधा पुरवेल.

अरुण कुमार सिंह म्हणाले,”इलेक्ट्रिक मोबिलिटीला समर्थन देण्यासाठी आम्ही आमच्या देशव्यापी नेटवर्कची मदत घेऊ. सुमारे 7,000 पारंपारिक रिटेल आउटलेट्सला एनर्जी सेंटरमध्ये रुपांतरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

रिपोर्टनुसार कंपनी सध्या 44 चार्जिंग स्टेशन चालवते. सिंग यांनी असेही सांगितले की, बीपीसीएल पुढील पाच वर्षांत इनऑरगॅनिकपद्धतीने 1,000 मेगावॅटचा रिन्यूएबल एनर्जी पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी 5,000 कोटी रुपये खर्च करनार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) ने अलीकडेच म्हटले आहे, की तीन वर्षांत देशभरात 5000 EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची त्यांची योजना आहे. कंपनीकडे सध्या भारतात 84 EV चार्जिंग स्टेशन आहेत.

Comments are closed.