टी-२० विश्वचषकादरम्यान क्रिकेटप्रेमींसाठी ‘महा स्पोर्ट्स’ घेऊन येणार व्हिडिओ, ग्राफिक कंटेंटचा थरार!

देशातील प्रादेशिक भाषेतील पहिली स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट म्हणून mahasports.in (महा स्पोर्ट्स डॉट इन ) वेबसाईट ओळखली जाते. मराठी भाषेत क्रिकेटसह अनेक खेळांचे जबदरस्त विश्लेषण ‘महा स्पोर्ट्स’ या वेबसाईटवर पाहायला मिळते. आता हीच वेबसाईट क्रिकेटप्रेमींसाठी विश्वचषकादरम्यान काही खास घेऊन येत आहे.

‘आयसीसी टी२० विश्वचषक’ १७ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई आणि ओमान देशामध्ये होत आहे. आयसीसीचा टी२ क्रीडा प्रकारातील हा ७वा विश्वचषक असून भारतीय संघाला या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार समजले जात आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या विश्वचषकासाठी mahasports.in (महा स्पोर्ट्स डॉट इन) मराठीत नवनवे लेख, व्हिडिओ आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे.

प्रत्येक सामना संपल्यानंतर लाईव्हच्या माध्यमातून सोशल मीडियावर महा स्पोर्ट्सच्या तज्ञ विश्लेषकांकडून सामन्याचे विश्लेषण केले जाणार आहे. तसेच दररोज मोठ्या प्रमाणावर संपूर्ण स्पर्धेदरम्यान व्हिडिओ कंटेंटवर भर दिला जाणार आहे. महा स्पोर्ट्स वेबसाईट तिच्या युनिक कंटेंटसाठी नेहमीच ओळखली जाते. तसेच महा स्पोर्ट्सचे ग्राफिक्स देखील क्रिकेटप्रेमींकडून पसंत केले जातात.

‘डिजी रॉईस्टर’ ही महा स्पोर्ट्सची पॅरेंट कंपनी असून येऊ घातलेल्या विश्वचषकाबद्दल बोलताना डिजी रॉईस्टरचे सीईओ आणि सहसंस्थापक शरद बोदगे म्हणाले, ‘आम्हाला खूप मोठा मराठी क्रीडाप्रेमी वाचकवर्ग लाभलेला आहे. दररोज जवळपास १० लाखांपेक्षा जास्त वाचक महा स्पोर्ट्सवर लेख किंवा बातम्या वाचतात. त्यांना आम्ही विश्वचषकादरम्यान काही खास भेट देण्याचा विचार करत आहोत. ही भेट अर्थातच ग्राफिक आणि व्हिडिओच्या माध्यमातून असेल.’

महा स्पोर्ट्स ३० डिसेंबर २०१६ या दिवशी सुरु झाली असून लवकर आपला ५वा वाढदिवस साजरा करणार आहे. विश्वचषक आणि ५वा वाढदिवस असे दुहेरी योगायोग २०२१च्या शेवटच्या काही महिन्यात येणार आहे.

याबद्दल बोलताना डिजी रॉईस्टरचे सीओओ आणि सहसंस्थापक चिन्मय रेमणे म्हणाले, ‘मराठी कंटेंटसाठी आता नक्कीच चांगले दिवस आहेत. त्यातही क्रीडा क्षेत्राशी संदर्भातील गोष्टी वाचकांना वाचायला, पाहायला आणि जाणून घ्यायला नक्की आवडतात. म्हणूनच आम्ही विश्वचषकाचे औचित्य साधून युझर फ्रेंडली कंटेंटवर भर देणार आहोत. तसेच महा स्पोर्ट्स वेबसाईट विश्वचषकादरम्यान चाहत्यांना एका वेगळ्याच रुपात नक्की दिसेल. ‘

महा स्पोर्ट्सची सुरुवात शरद बोदगे व चिन्मय रेमणे या पुणेस्थित तरुणांनी २०१६ मध्ये केली होती. स्पोर्टमधे मराठीत कंटेंट निर्माण करणारी एक अग्रगण्य वेबसाईट म्हणून महा स्पोर्ट्सकडे पाहिले जाते. महिन्याला जवळपास ३ कोटींहून अधिक पेजव्हूज महा स्पोर्ट्सला मिळतात. सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या वेबसाईटकडे स्पोर्ट्समधील एक खात्रीशीर बातम्या देणारी वेबसाईट म्हणून पाहिले जाते.

Comments are closed.