शिक्षण क्षेत्रातील ‘ही’ स्टार्टअप ऑन टॉप – गाठला महत्वपूर्ण टप्पा
भारतीय एडटेक कंपनी Byju ने 10 डॉलर अब्ज पेक्षा जास्त व्ह्ल्यूएशन करत टॉप 35 युनिकॉर्नच्या या वर्षीच्या जागतिक यादीत स्थान मिळवले आहे.
भारतीय एडटेक कंपनी Byju ने 10 डॉलर अब्ज पेक्षा जास्त व्ह्ल्यूएशन करत टॉप 35 युनिकॉर्नच्या या वर्षीच्या जागतिक यादीत स्थान मिळवले आहे.
Byju आपले मूल्य 21 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचणारी पहिली देशांतर्गत स्टार्ट-अप बनली आहे. CB इनसाइट्सच्या ताज्या आकडेवारीच्या आधारे हे जगातील 13 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे युनिकॉर्न आहे.
दरम्यान Byju जगातील सर्वात मूल्यवान एडटेक स्टार्ट-अप बनले आहे, ज्याने चीनी एडटेक फर्म Yuanfudao ला मागे टाकले आहे. सध्या Yuanfudao चे मूल्य 15.58 अब्ज डॉलर आहे.
दरम्यान Byju ला अनेक भारतीय कंपन्यांसोबत देखील स्पर्धा करावी लागत आहे. यात Unacedemy, वेदांत यांचा समावेश होतो.
Comments are closed.