१०५ रुपये प्रति शेअर डिव्हीडंड, गुंतवणूकदारांची चांदी 

Investors are happy as they get 105 rupees dividend from HeroMotoCorp

भारतातील आघाडीची दुचाकी बनवणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपला निकाल काल जाहीर केला. मार्च २०२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यामध्ये ३९.४% ची वाढ झाली.

या तिमाहीमध्ये कंपनीने १५.६८ लाख गाड्यांची विक्री केली जी गेल्यावर्षीच्या तुलनेत १८.% ने जास्त आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने १३.२३ लाख गाड्यांची विक्री केली होती.

कंपनीच्या निकालबाबत विश्लेषकांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कंपनीने जास्त चांगला निकाल नोंदवला.  CNBC18 वाहिनीने कंपनीला ८१० कोटींचा नफा होईल तर महसूल ८४२५ कोटी एवढा असेल असे भाकीत केले होते. मात्र कंपनीने हा अंदाज चुकीचा ठरवत ८६५ कोटींचा नफा तर ८६८६ कोटींचा महसूल नोंदवला.

कंपनीने २५ रुपये प्रति शेअरचा डिव्हीडंड जाहीर केला तसेच १० रुपये प्रति शेअरचा स्पेशल डिव्हीडंडसुद्धा जाहीर केला आहे. यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात दिलेले सगळे डिव्हीडंड मिळून कंपनीने १०५ रुपये प्रतिशेअर एवढा डिव्हीडंड दिला आहे.

Comments are closed.