590 कोटींचा IPO आणणाऱ्या या फर्मचे शेअर वाटप आज – वाचा सविस्तर

डेटा पॅटर्नने 14 ते 16 डिसेंबर दरम्यान आणलेल्या IPO साठी अंतिम शेअर वाटप स्टेटस जाहीर केले आहे. आता, गुंतवणूकदार वेबसाइटवर डेटा पॅटर्न IPO शेअर वाटप स्टेटस ऑनलाइन तपासू शकतात. डेटा पॅटर्न IPO ला पब्लिक ऑफरच्या तीन दिवसांत 119.62 पटीने ओव्हरसबस्क्राइब केले गेले.

डेटा पॅटर्नने 14 ते 16 डिसेंबर दरम्यान आणलेल्या IPO साठी अंतिम शेअर वाटप स्टेटस जाहीर केले आहे. आता, गुंतवणूकदार वेबसाइटवर डेटा पॅटर्न IPO शेअर वाटप स्टेटस ऑनलाइन तपासू शकतात. डेटा पॅटर्न IPO ला पब्लिक ऑफरच्या तीन दिवसांत 119.62 पटीने ओव्हरसबस्क्राइब केले गेले.

डेटा पॅटर्न IPO साठी किंमत बँड 555-585 रू.वर सेट केला होता. गुंतवणूकदार डेटा पॅटर्न IPO GMP (ग्रे मार्केट प्राईस) जाणून घेण्यासाठी देखील उत्सुक असतील. IPO Watch नुसार मार्केट प्रीमियम 230 च्या आसपास आहे.

BSE आणि NSE वर सदर IPO 24 डिसेंबर रोजी लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. तुम्ही अद्याप अलॉटमेंट पाहिली नसेल, तर खालील स्टेप्सचा वापर करा.

डेटा पॅटर्न IPO शेअर वाटप स्टेटस BSE द्वारे –

शेअर वाटपाची स्टेटस तपासण्यासाठी BSE हे सर्वात सुरक्षित व्यासपीठ आहे. सर्व शेअर वाटपाचे स्टेटस bseindia.com वर तपासले जाऊ शकतात.

1. प्रथम, BSE वेबसाइट लिंक येथे भेट द्या – https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx .

2. इश्यू प्रकार पर्यायाखालील इक्विटीवर क्लिक करा.

3. इश्यूचे नाव टाका.(डेटा पॅटर्न )

4. तुमचा अर्ज क्रमांक आणि पॅन क्रमांक टाका.

5. ‘मी रोबोट नाही’ याची पुष्टी करा आणि सर्च बटणावर टॅप करा.

डेटा पॅटर्न IPO शेअर वाटप स्टेटस लिंक इनटाइम द्वारे

1. प्रथम लिंकद्वारे लिंक इनटाइमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html .

2. नंतर इक्विटी पर्याय निवडा

3. ड्रॉप डाउन मेनू अंतर्गत इश्यूचे नाव – डेटा पॅटर्न टाका.

4. त्यानंतर, तुमचा पॅन कार्ड क्रमांक, अर्ज क्रमांक किंवा क्लायंट आयडी टाका.

5. ‘मी रोबोट नाही’ वर क्लिक करून कॅप्चाची पुष्टी करा आणि शेवटी सबमिट बटणावर टॅप करा.

तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर डेटा पॅटर्न IPO च्या वाटपाचे स्टेटस मिळेल.

Comments are closed.