राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला ‘हा’ IPO आज झाला लिस्ट – वाचा अपडेट्स
फूटवेअर कंपनी मेट्रो ब्रँड्स लिमिटेडच्या शेअर्सनी बुधवारच्या सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील आपले पदार्पण NSE वर 437 रू प्रति शेअरने केले. जे त्यांच्या 500 रू.च्या इश्यू किमतीवर 12.6% डिस्काउंट आहे. BSE वर, शेअर 436 रू प्रति शेअर वर लिस्टिंग झाला.

मेट्रो ब्रँड्सच्या तीन दिवसांच्या पब्लिक ऑफरचे शेअर्स सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी 3.64 वेळा सबस्क्राइब झाले होते. IPO 10 डिसेंबर रोजी उघडला आणि 14 डिसेंबर रोजी बंद झाला. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 410 कोटींहून अधिक जमा केले होते. ऑफरची किंमत 485- 500 रू प्रति शेअर होती.
मेट्रो ब्रँड्सच्या IPO मध्ये 295 कोटीचा फ्रेश इश्यू आणि 21450100 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) होती. कंपनीने फेश इश्यूमधून मिळणारे उत्पन्न ‘मेट्रो’, ‘मोची’, ‘वॉकवे’ आणि ‘क्रोक्स’ ब्रँड अंतर्गत आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी कंपनीचे नवीन स्टोअर उघडण्यासाठी खर्चासाठी वापरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सध्या मेट्रो ब्रँड्सचे भारतातील 136 शहरांमध्ये 598 स्टोअर्स आहेत. त्यापैकी 211 दुकाने गेल्या तीन वर्षांत उघडण्यात आली. आर्थिक वर्ष 2021 मध्ये मेट्रो ब्रँड्सकडे भारतातील विशेष रिटेल आउटलेटची तिसरी सर्वाधिक संख्या होती.
Comments are closed.