126 कोटींचा IPO आणणाऱ्या या फर्मच शेअर वाटप आज – वाचा सविस्तर

15-17 डिसेंबर दरम्यान पब्लिक ऑफरसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ॲडेसिव्ह आणि सीलंट कंपनी HP Adhesives आज त्यांचे शेअर वाटप निश्चित करेल.

15-17 डिसेंबर दरम्यान पब्लिक ऑफरसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ॲडेसिव्ह आणि सीलंट कंपनी HP Adhesives आज त्यांचे शेअर वाटप निश्चित करेल.

कंपनीच्या IPO ला 20.96 पट सबस्क्रिप्शन मिळाले. 25.28 लाख शेअर्स साइज तुलनेत IPO साठी 5.29 कोटी शेअर्ससाठी बोली लागली.

रिटेल गुंतवणूकदारांनी आरक्षित भागाच्या 81 पट बोली लावली, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भागाची सदस्यता 19 पट झाली आणि पात्र संस्थागत गुंतवणूकदारांनी 1.82 पट बोली लावली.

HP Adhesives च्या 126 कोटींच्या पब्लिक इश्यूमध्ये 113.43 कोटींचा फ्रेश इश्यू आणि अंजना हरेश मोटवानीच्या 12.52 कोटीच्या ऑफर-फॉर-सेलचा समावेश आहे.ऑफरचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर 262-274 रुपये सेट केला होता.

बीएसई आणि IPO रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर शेअर वाटप स्थिती कशी तपासायची –

1. इश्यू प्रकार (इक्विटी) आणि इश्यूचे नाव (HP Adhesives) निवडा.

2. अर्ज क्रमांक आणि पॅन क्रमांक टाका.

3.शेवटी चेक बॉक्सवर (मी रोबोट नाही) आणि सर्च बटणावर क्लिक करा.

IPO रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर असं तपासा –

1. कंपनीचे नाव निवडा (HP Adhesives)

2.पॅन क्रमांक, किंवा अर्ज क्रमांक, किंवा DP/क्लायंट आयडी, किंवा खाते क्रमांक / IFSC टाका.

3. आणि शेवटी कॅप्चा टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

शेअर वाटप अंतिम झाल्यानंतर, अयशस्वी बोलीदारांना 23 डिसेंबर रोजी परतावा मिळेल, तर यशस्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये 24 डिसेंबर रोजी शेअर्स मिळतील.

कंपनी बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 27 डिसेंबर रोजी लिस्टिंग होण्याची अपेक्षा आहे.

Comments are closed.