चांगल्या गुंतवणुकीच्या शोधात? दिवाळीनंतर येणारा ‘हा’ आयपीओ तुम्हाला देणार मोठी संधी

काही रिपोर्ट्सनुसार, लॉजिस्टिक कंपनी Delhivery ने IPO साठी त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सेबीकडे दाखल केला आहे. सदर IPO ची इश्यू साइज 7,460 कोटी रुपये असू शकते.

Delhivery IPO मध्ये 5,000 कोटी रुपयांचे प्रायमरी इश्यू असतील. गुंतवणूकदारांद्वारे 2,460 कोटी रुपयांच्या विक्रीच्या ऑफरचा यात समावेश असेल.

चायना मूमेंटम फंड 400 कोटी रुपये, कार्लाइल 920 कोटी रुपये, सॉफ्टबँक 750 कोटी रुपये आणि टाइम्स इंटरनेट 330 कोटी रुपये IPO मध्ये विक्रीसाठी उभारतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार IPO मधील इश्यूमध्ये कंपनीकडून संभाव्य मूल्यांकनाची अपेक्षा 5.5 बिलियन डॉलर इतकी आहे.

IPO मधून मिळणार्‍या उत्पन्नातून ऑरगॅनिक ग्रोथमधून 2,500 कोटी धोरणात्मक उपक्रम आणि जनरल कॉर्पोरेट हेतूसाठी 1,250 कोटीचा निधी वापरला जाईल.

Delhivery, ही देशांतर्गत लॉजिस्टिक कंपनी आणि पुरवठा साखळी पूर्ण करणारी फर्म म्हणून ओळखली जाते. कंपनीने यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी झालेल्या EGM मध्ये मांडलेल्या ठरावाद्वारे स्टेकहोल्डरना बोनस शेअर्स जारी केले होते.

Delhivery चे सह-संस्थापक आणि सीईओ साहिल बरुआ यांनी सांगितले की, फर्मची पुढील सहा ते आठ महिन्यांत लिस्टिंग करण्याची आणि 400-500 मिलियन डॉलरचा इश्यू उभारण्याची योजना आहे.

Comments are closed.