‘टेक कंपन्यांमधे गुंतवणूक कराल का?’ या प्रश्नावर राकेश झुनझुनवालांचं उत्तर होतं…
शेअर मार्केटमधील टॉपचे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला हे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एकूणच मार्केट उलाढालीवर उत्साही आहेत. नुकतेच, झुनझुनवाला यांनी एका मुलाखतीत सांगितले, ” सध्या मला निफ्टी 16,500 च्या खाली जाताना दिसत नाहीये, पुढच्या वर्षीपर्यंत मार्केट हाई असेल असा माझा अंदाज आहे”.
झुनझुनवाला यांची ही कमेंट अशा वेळी आली आहे, जेव्हा निफ्टीने 5 टक्क्यांहून अधिक सुधारणा केली होती. पुरवठा साखळीतील अडचणींमुळे इंधन, अन्न आणि वस्तूंच्या किमती वाढल्याने जगभर चिंता वाढत आहेत. मात्र झुनझुनवाला यांच्यामते, ” ही महागाईची चिंता तात्पुरती आहे “. चिनी पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे महागाई वाढली आहे, असेही ते म्हणाले.
झुनझुनवाला EV बद्दल बोलताना म्हणाले, “जसा व्हॉल्यूम वाढत जाईल तस इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होत जाईल”.
प्रदूषण कमी करण्यासाठी EV चा प्रचार जगभरात आणि भारतात केला जात आहे. भारतात, इंधनावर पर्याय म्हणून EV कडे पाहिले जात आहे. भारतात तब्बल 80-85 टक्के इंधन आयात केले जाते.
सध्या IPO चे फॅड आहे आणि बऱ्याच टेक कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. याबाबत बोलताना झुनझुनवाला म्हणाले, टेक कंपन्यांचा “स्ट्राइक रेट” कमी असेल. यापैकी काही कंपन्यांच्या कामगिरीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, टेक कंपन्यांच्या IPO मध्ये तुम्ही गुंतवणूक कराल का? असे विचारले असता ते म्हणाले, “मला यात इंटरेस्ट नाही. मला सदर कंपन्यांबद्दल भाष्य करायला आवडणार नाही, पण मूल्यमापनानुसार, मला यात काही स्वारस्य नाही, पण काही कंपन्या ज्या वेगाने काम करत आहेत याचा मला अभिमान आहे.
झुनझुनवाला यांच्याद्वारे समर्थित मोबाईल गेमिंग कंपनी नझारा टेक्नॉलॉजीने मार्च 2021 मध्ये त्यांच्या IPO द्वारे 583 कोटी रुपये उभारले होते.
बँकाबद्दल बोलताना ते म्हणाले, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, डिपोसिट हा बँकाचा सर्वात मोठा स्रोत आहे. त्यांच्या गुंतवणुकीच्या रणनीतीबद्दल बोलताना झुझुनवाला म्हणाले की, जेव्हा किंमती जास्त असतात तेव्हा ते विक्री करतात.
झुनझुनवाला असेही म्हणाले की, “मी सार्वजनिक क्षेत्रातील PSU बँकांबद्दल अत्यंत उत्साही आहे. मूल्याकनाबाबत बोलताना ते म्हणाले, आजही काही मूल्यांकन खूपच हास्यास्पद असतात. आमच्याकडे 2-3 वेळा EBITDA मूल्यांकन केलेल्या कंपन्या आहेत.पण माझ्यामते हे मूल्यांकन असू शकत नाही.”
दरम्यान विमान वाहतूक क्षेत्रातील वाढ सर्वांना आश्चर्यचकित करेल, असेही ते म्हणाले.
Comments are closed.