पॉलीसीबझारने का केला आयपीओचा व्हॉल्युम कमी? गुंतवणुक करण्यापुर्वी जाणून घ्या सविस्तर कारण

PB फिनटेकचे सह-संस्थापक यशिश दहिया आणि आलोक बन्सल यांनी पॉलिसीबाजार IPO द्वारे विकल्या जाणार्‍या शेअर्सची संख्या अचानक कमी केली आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार दहिया आणि बन्सल आता अनुक्रमे 30 कोटी आणि 12.75 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. जेव्हा PB फिनटेकने ऑगस्टमध्ये ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला होता, तेव्हा कंपनीचे सीईओ दहिया यांना 250 कोटी रुपयांचे शेअर्स विकायचे होते. नवीन आकडेवारीनुसार त्यांच्या शेअर्सची विक्री 88 टक्क्यांनी कमी झाली आहे.

CFO बन्सल यांना DRHP मधील डेटाच्या आधारे 95 कोटी रुपयांचे शेअर्स विकायचे होते. ती संख्या आता जवळपास 87 टक्क्यांनी कमी झाली आहे. सूत्रांनुसार कंपनीला 6,017 कोटी रुपयांच्या नियोजित रकमेची त्वरित गरज नव्हती, त्यामुळे संस्थापकांनी त्यांचे शेअर्स राखून ठेवले.

शेअरहोल्डर्स शिखा दहिया आणि राजेंद्र सिंग कुहार यांनीही IPO मधील शेअर्सचे प्रमाण कमी केले आहे. शिखा दहिया आता 12.2 कोटी किमतीचे शेअर्स विकणार आहेत, जे पूर्वी 12.7 कोटी होते. कुहार यांच्या शेअरची विक्री 7.5 कोटींवरून 3.5 कोटी रुपये झाली आहे.

संस्थापक आणि इतर स्टेकहोल्डरनी ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये कपात केल्यामुळे, IPO चा आकार आता 5,700 कोटींवर आला आहे, दरम्यान प्रायमरी इश्यू 3,750 कोटी झाला आहे.

दहिया यांनी सांगितले की, एकूण उभारलेल्या 400 मिलियन डॉलरमधील गेल्या 13 वर्षांपासून 70 टक्के अजूनही न वापरलेली आहे. “आम्ही पॉलिसीबझार आणि पैसाबाजार एकत्रीत 70 मिलियन डॉलर्समध्ये उभारले आहेत. कधी तोटा तर कधी नफा ह्या गोष्टी गृहीत धरूनच आम्ही पुढे चाल करत आहोत.”

DRHP नुसार, सॉफ्टबँक व्हिजन फंडचा कंपनीमध्ये 15.76 टक्के सर्वात मोठा स्टेक आहे, जे 1,875 कोटी रुपयांचे शेअर्स विकत आहे. यानंतर मेकशिफ्ट टेक्नॉलॉजीज (इन्फोएज) आणि टेनसेंट यांचा प्रत्येकी 14.56 टक्के आणि 9.16 टक्के स्टेक आहे. DRHP नुसार दहिया यांच्याकडे कंपनीत 4.27 टक्के स्टेक आहे.

PB फिनटेकचा IPO 1 नोव्हेंबर रोजी उघडला आहे, जो 3 नोव्हेंबर 2021 रोजी बंद होईल, शेअर्स किंमत बँड 940-980 च्या दरम्यान सेट केला जाईल.

Comments are closed.