रिअल इस्टेटमध्ये भरभराटी, DLF कडे प्रोजेक्टची रांग – वाचा सविस्तर

DLF to launch projects in medium term with sales of about Rs 40,000 crore

रिअल इस्टेट क्षेत्रात नावाजलेले DLF Ltd हे नवीन प्रोजेक्टची एक मजबूत पाइपलाइन म्हणून ओळखले जाते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार DLF सुमारे 40,000 कोटी रुपयांच्या विक्री क्षमतेसह मिडीयम टर्ममध्ये 35 मिलियन स्क्वेअर फूट क्षेत्र विकसित करण्यासाठी लाँच करेल.

DLF ने याबाबत खुलासा केला की चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत जवळपास 8 मिलियन स्क्वेअर फूट क्षेत्र लॉन्च केले जाईल.

कंपनीने म्हटले, “मिड टर्ममध्ये सुमारे 35 मिलियन स्क्वेअर फुटाच्या प्रोजेक्टचा त्यांचा नियोजित प्लॅन आहेत.”

हे प्रोजेक्ट पायाभूत सुविधांसह सुरू केले जातील. 35 मिलियन स्क्वेअर फूट प्रोजेक्टची एकूण विक्री क्षमता 36,000-40,000 कोटी रुपये आहे.

DLF ने या वर्षी सप्टेंबरपर्यंत नियोजित 35 मिलियन स्क्वेअर फुटांपैकी 2 मिलियन स्क्वेअर फूट आधीच लॉन्च केले आहेत.

या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 7.7 मिलियन स्क्वेअर फूट प्रोजेक्ट लाँच करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी लॉन्च पाइपलाइन ही 6.4 मिलियन स्क्वेअर फूट आणि 7.2 मिलियन स्क्वेअर फूट आहे. उर्वरित 12.2 मिलियन स्क्वेअर फूट 2024 नंतर लॉन्च केले जाईल.

विक्री क्षमतेच्या दृष्टीने, DLF ला दिल्लीजवळील मोती नगर येथील गृहनिर्माण प्रकल्पातून 12,000-15,000 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.

कंपनी, दिल्लीमध्ये 8 मिलियन स्क्वेअर फूट प्रोजेक्ट डेव्हलमेंट करत आहे, त्यापैकी 2 मिलियन स्क्वेअर फूट पुढील वर्षी मार्चपर्यंत सुरू होईल.

गुरुग्राम, चेन्नई आणि चंदीगढ परिसरात 9 मिलियन स्क्वेअर फूट किमतीची घरे 4,500 कोटी रुपयांच्या विक्री किमतीसाठी लॉन्च करण्याची योजना आहे.

DLF सध्या गुरुग्राममध्ये एक ऑफिस पार्क विकसित करत आहे. या प्रोजेक्टचा एकूण आकार 3 मिलियन स्क्वेअर फूट असून त्याची विक्री क्षमता 6,000-7,000 कोटी रुपये आहे.

त्याशिवाय, DLF नोएडामध्ये आयटी पार्क तसेच गुरुग्राम आणि दिल्लीमध्ये प्रोफेशनल प्लेस लाँच करण्याची योजना आखत आहे.

DLF ने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत आधीच 2,500 कोटी रुपयांच्या रेसिडेन्सी ॲसेटची विक्री केली आहे.

या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने प्रत्येक तिमाहीत 1,000 कोटी रुपयांच्या बुकींग केल्या होत्या.

DLF ने जुलै-सप्टेंबर या कालावधीत आपले निव्वळ कर्ज 16 टक्क्यांनी कमी करून या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीच्या अखेरीस 4,745 कोटी रुपयांवरून 3,985 कोटी रुपये केले आहे.

गेल्या आठवड्यात, DLF ने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत एकत्रित नेट प्रॉफिटमध्ये 66 टक्क्यांनी वाढ नोंदवून ती 378.12 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न 1,556.53 कोटी रुपयांवर घसरले आहे, जे मागील वर्षाच्या याच कालावधीत 1,723.09 कोटी रुपये होते.

गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात, DLF चे CEO अशोक कुमार त्यागी म्हणाले की, “आम्ही घरांच्या वाढत्या विक्रीमुळे आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे मार्केटमध्ये नवीन ऑफर आणण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

DLF ने आतापर्यंत 153 रिअल इस्टेट प्रकल्प विकसित केले आहेत आणि अंदाजे 330 मिलियन स्क्वेअर फूट क्षेत्र विकसित केले आहे.

कंपनीकडे सध्या रेसिडेन्सी आणि व्यावसायिक विभागात 215 मिलियन स्क्वेअर फूट क्षमता आहे. कंपनीचा पोर्टफोलिओ 35 मिलियन स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त आहे.

Comments are closed.