दिवाळीचा बोनस लाँग टर्म गुंतवणुकीसाठी वापरताय? तर मग हे वाचाच
Where should you invest your Diwali bonus this year?
सध्या दिवाळीचा मोसम आहे, त्यामूळे बहुतेक पगारदार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून दिवाळी बोनस मिळतो. बहुतेक कर्मचारी ही रक्कम सणासुदीच्या खरेदीसाठी वापरतात. पण जर ही रक्कम दरवर्षी गुंतवणूक म्हणून गुंतवली गेली तर ती लाँग टर्ममध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण आणि लग्न यांसारखी तुमची दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करू शकते. तुमच्या दिवाळी बोनसची गुंतवणूक करण्यासाठी येथे काही पर्याय आम्ही तुम्हाला देत आहोत.
फिक्स डिपॉसिट
जर तुम्ही रिस्क न घेणारे गुंतवणूकदार असाल तर फिक्स डिपॉसिट हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यायां आहे. सध्या, बँका लाँग टर्मच्या फिक्स डिपॉसिटवर 5% ते 6.5% च्या दरम्यान ऑफर देत आहेत. पण तुम्ही तुमचा बोनस FD मध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, बँका आणि पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या व्याजदरांची तुलना करणे आवश्यक आहे.
SBI चे FD दर
7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीतील SBI FD दर ग्राहकांना 2.9% ते 5.4% व्याजदर देतात. या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना ५० बेसिस पॉइंट्स (bps) अतिरिक्त मिळतील. सदर दर 8 जानेवारी 2021 पासून लागू आहेत.
HDFC बँक FD दर
HDFC बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 2.50% ते 5.50% पर्यंत व्याज देते. बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी, ते 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3% ते 6.25% पर्यंत व्याजदर देते.
ICICI बँक FD दर
ICICI बँक 7 दिवस ते 10 वर्षाच्या ठेवींवर 2.5% ते 5.50% पर्यंत व्याजदर देते.
पोस्ट ऑफिस FD व्याज दर
पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट योजना सध्या सर्वाधिक आकर्षक आहेत ज्यात जास्त व्याज भेटत आहे. पोस्ट ऑफिस एक वर्ष ते पाच वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवी देतात. एक वर्ष ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी, पोस्ट ऑफिस ठेवींवर 5.5% व्याज दर मिळतो. पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांच्या मुदत ठेव खात्यासाठी, गुंतवणूकदारांना 6.7% व्याज दर मिळू शकतो.
सोने आणि SGB
भारतात विशेषत: धनत्रयोदशी आणि दिवाळी दरम्यान सोने खरेदी करण्यासाठी आवडीचा मोसम असतो. या प्रसंगी लोक सोन्याची नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. तथापि, तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असाल तर प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा SGB मध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे. SGB खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत कारण तेथे व्यवहाराची किंमत शून्य आहे आणि तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेवर 2.5% व्याज मिळते. तसेच, जर तुम्ही SGB मॅच्युरिटीपर्यंत धारण करत असाल, तर कोणताही भांडवली नफा तुमच्यावर लादला जात नाही.
SGB मध्ये किमान गुंतवणूक 1 ग्रॅम सोने आहे, तर कमाल मर्यादा एका व्यक्तीसाठी 4 किलो, HUF साठी 4 किलो आणि ट्रस्ट आणि संस्थांसाठी 20 किलो असेल.
म्युच्युअल फंड
दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम प्रकार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डेट म्युच्युअल फंडांच्या तुलनेत इक्विटी म्युच्युअल फंड अधिक अस्थिर असतात. परंतु इक्विटी MF जास्तीचा परतावा देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही दीर्घ मुदतीच्या उद्दिष्टासाठी बचत करत असाल, तर तुम्ही तुमचा दिवाळी बोनस इक्विटी MF योजनांमध्ये गुंतवू शकता.
Comments are closed.