तयार रहा, आठ नवे आयपीओ येतायत

Eight new IPOs coming in next months

या वर्षीच्या मार्च महिन्यात एकामागे एक असे अनेक आयपीओ येत गेले. नक्की कोणत्या आयपीओची निवड करायची असा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराला पडत होता आणि त्यानंतर मात्र एप्रिल आणि मे महिन्यात रिटेलर्स ला आकर्षित करेल असा १ सुद्धा आयपीओ आला नाही.

येत्या काही महिन्यात पुन्हा एकदा आपल्याला एका मागोमाग एक आयपीओ पहायला मिळू शकतात. सेबीने (सेक्युरटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने) झोमॅटो, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, आरोहण फायनान्शियल सर्व्हिसेस, डोल्डा डेअरी आणि ऍग्रोकेमिकल टेक्निकल्स कंपनी इंडिया पेस्टीसाइड्स यांना आयपीओ आणण्यास परवानगी दिली आहे. तसेच फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक, संमार केमप्लास्ट आणि कार ट्रेड यांनी सुद्धा सेबी कडे आयपीओ करता कागदपत्रांची पूर्तता केली आहे.

इंडिया पेस्टीसाइड्स ही उत्तर प्रदेशातील कृषी रसायनावर आधारित कंपनी आहे. कृष्णा इंस्टिट्यूट ही आंध्र प्रेदश आणि तेलंगानामधील हॉस्पिटल चेन असणारी सर्वात मोठी कंपनी आहे.
तर आरोहण ही कोलकाता आणि डोल्डा डेअरी ही हैद्राबाद येथील कंपनी आहे.

कंपनी का आणते आयपीओ?
कंपन्यांना आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तसेच नवीन प्रकल्प उभारण्यासाठी आणि जर कंपनीवर काही कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी आयपीओची मदत होते.

Comments are closed.