नोटीस पिरियडमध्ये मिळणाऱ्या पगारावर लागू शकतो GST, पण का? वाचा सविस्तर

जे कर्मचारी नोकरी सोडताना त्यांचा नोटीस पिरियड स्किप करण्याचा निर्णय घेतात त्यांना त्यांच्या अंतिम पगारावर वस्तू आणि सेवा कर (GST) भरावा लागेल, असे ऑथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंग (AAR) आज म्हटले आहे.

जे कर्मचारी नोकरी सोडताना त्यांचा नोटीस पिरियड स्किप करण्याचा निर्णय घेतात त्यांना त्यांच्या अंतिम पगारावर वस्तू आणि सेवा कर (GST) भरावा लागेल, असे ऑथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंग (AAR) आज म्हटले आहे.

AAR ने भारत ओमान रिफायनरीजच्या एका प्रकरणात निर्णय देताना सांगितले की, नोटिस पिरियड दरम्यान कर्मचार्‍यांकडून जीएसटी आकारला जाऊ शकतो.

सदर आदेशानुसार GST साठी लागू होणाऱ्या गोष्टीत नोटीस पे, ग्रुप इन्शुरन्स आणि टेलिफोन बिल यांचा समावेश आहे.

AAR च्या निर्णयानुसार, सदर वसुली करपात्र आहे कारण कंपनी कर्मचाऱ्याला “सेवा पुरवत आहे”, असे अहवालात म्हटले आहे.

या निर्णयाचा दाखला देत, तज्ज्ञांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीने कंपनीकडून काढलेला अंतिम पगार यावरही GST लागू होईल.

सूत्रांनुसार, नोटीस पिरियड न देता संस्था सोडलेल्या कर्मचार्‍यावर जमा झालेल्या एकूण रकमेवर कंपनी एकूण 18 टक्के जीएसटी आकारू शकते.

तज्ञानुसार, जेव्हा कर्मचार्‍याने नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तेव्हाच तो GST भरण्यास जबाबदार आहे. जेव्हा कर्मचार्‍याने नोटीस पिरियड पूर्ण केला आहे, तेव्हा कंपनीला या कालावधीत GST भरावा लागेल.

तज्ञांनी सांगितले की,कंपनी जॉईन करताना कर्मचाऱ्यांनी ऑफर लेटर काळजीपूर्वक वाचावे, कारण अंतिम पगारावर GST भरणे टाळण्यासाठी त्यांना त्यात नमूद केल्यानुसार नोटिस पिरियड पूर्ण करणे आवश्यक आहे.

ऑफर लेटरमध्ये सहसा एक ते तीन महिन्यांपर्यंतच्या नोटिस पिरियडचा उल्लेख असतो.

Comments are closed.