राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला IPO गुंतवणुकदारांना का नाही करू शकला आकर्षित? वाचा एका क्लिकवर

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचा 7,250 कोटींचा IPO या वर्षीचा तिसरा सर्वात मोठा IPO आहे. तर एकूण आठवा सर्वात मोठा IPO. दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला झाल्यानंतर IPO साठी गुंतवणूकदारांचा खूपच कमी प्रतिसाद मिळाला.

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचा 7,250 कोटींचा IPO या वर्षीचा तिसरा सर्वात मोठा IPO आहे. तर एकूण आठवा सर्वात मोठा IPO. दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला झाल्यानंतर IPO साठी गुंतवणूकदारांचा खूपच कमी प्रतिसाद मिळाला.

IPO साठी एकूण फक्त 79 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले. याचे मुख्य कारण आता चर्चिले जात आहे. गुंतवणुकदार बँकरची विक्रीसाठीची ऑफर (OFS) कमी करणे हेच याचे कारण होते असे म्हटले जात आहे.

या वर्षातील पेटीएम नंतरची ही दुसरी मोठी ऑफर आहे, ज्याला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही. यानुसार IPO चा उन्माद असूनही गुंतवणूकदार गुंतवणुकीबाबत समजूतदार ठरले आहेत.

स्टार हेल्थ स्वतः सेट केलेल्या स्टँडर्डला देखील क्रॉस करु शकला नाही. IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा इतर IPO साठी 35% च्या तुलनेत 10 टक्के होता.

IPO साठी QIB भाग पूर्णपणे सबस्क्राईब झाला आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी IPO मध्ये 3,200 कोटी आणि अँकर बुकमध्ये 3,217 कोटींच्या बोली लावल्या. म्युच्युअल फंडांनी IPO मध्ये एकही बोली लावली नाही. संस्थात्मक कोट्यातील जवळपास 90 टक्के बोली विदेशी गुंतवणूकदारांकडून आल्या होत्या, तर देशांतर्गत संस्था, प्रामुख्याने विमा कंपन्यांनी केवळ 206 कोटी रुपयांच्या शेअर्ससाठी अर्ज केला होता. सूत्रांनी सांगितले की, गेल्या महिन्यात लिस्टिंग झालेल्या विमा एग्रीगेटर पॉलिसीबाझारने देखील IPO मध्ये अर्ज केला होता, ज्यामुळे कंपनीला महत्त्वपूर्ण सबस्क्रिप्शन मार्क गाठण्यात मदत झाली.

IPO चा रिटेल भाग 784 कोटी रुपयांच्या बोलींसह सबस्क्राईब झाला. HNI पोर्शन आणि कर्मचारी कोटा अनुक्रमे 19 टक्के आणि 10 टक्के रिक्त राहिला. इन्व्हेस्टमेंट बँकर्सने OFS ची छाटणी केल्यामुळे स्टार हेल्थ्सचा IPO कमी पडला.

Comments are closed.