फोर्ड भारताबाहेर पण गुंतवणूक सुरूच, केली ‘ इतकी ‘ गुंतवणूक

Ford infuses over Rs 5,000 crore in Indian unit to manage exit costs

यूएस ऑटो कंपनी फोर्ड मोटरने आपल्या भारतीय उपकंपनीमध्ये या 5,000 कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा निर्णय भारतातून बाहेर पडण्याची घोषणा केल्याच्या अवघ्या काही आठवड्यांतच घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये 2,175 कोटी रुपये आणि या महिन्यात 2,900 कोटी रुपये अशा दोन टप्प्यांत निधी जमा करण्यात आला आहे.

भारतीय उपकंपनीमध्ये निधी गुंतवण्यामागील नेमके कारण कळाले नाही, परंतु याचा वापर डीलर्स आणि विक्रेत्यांकडे थकित पेमेंट भरण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना वेगळे पॅकेज देण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात भारतातून बाहेर पडण्याच्या घोषणेच्या वेळी फोर्डने म्हटले होते की, सुमारे 2 अब्ज डॉलर्स प्री चार्ज टॅक्समध्ये 2021 मध्ये सुमारे 0.6 अब्ज डॉलर, 2022 मध्ये 1.2 अब्ज डॉलर्स टॅक्स आकारला गेला. यापैकी, एकूण कॅश चार्जेस 1.7 अब्ज डॉलर आहेत.

भारतात 2 अब्ज डॉलर्सचा तोटा आणि कमी होणाऱ्या व्हॉल्युममुळे फोर्ड मोटरला कंपनी बंद करावी लागली. या निर्णयामुळे 4,000 हून अधिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली.

कंपनी चेन्नई आणि गुजरातमधील सानंद येथील उत्पादन सुविधा विकण्यासाठी अनेक खरेदीदारशी बोलत आहे.

भारतीय ऑपरेशनवर फोर्डने बंदी आणल्यावर एका महिन्यात फोर्ड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा कंपनीतून बाहेर पडले आणि टाटा मोटर्समध्ये सामील झाले.

चेन्नईमध्ये टाटा मोटर्सने फोर्डची उत्पादन सुविधा घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

फोर्डचे सीईओ जिम फार्ले यांच्या नेतृत्वात, फोर्ड मोटरने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला ब्राझीलमधील उत्पादन कार्य बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

फोर्ड इंडियाने सप्टेंबरमध्ये सांगितले होते की, ते भारतात वाहनांचे उत्पादन त्वरित बंद करेल. निर्यातीसाठी वाहनांचे उत्पादन डिसेंबर तिमाहीपर्यंत सानंद येथे बंद होईल, तर चेन्नई इंजिन आणि वाहन असेंब्ली प्लांटमधील कामकाज पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत संपेल.

Comments are closed.