इन्शुरन्स बाबतीत ‘ हे ‘ 4 ॲड ऑन ठरू शकतात फायदेशीर – वाचा सविस्तर

Four little-known motor insurance add-ons that are critical for vehicle owners

रस्ते अपघात, वाहन चोरी, वाहनांची झीज या वाढत्या घटनांमुळे लोक त्यांच्या वाहनांच्या सुरक्षेसाठी मोटार इन्शुरन्स संरक्षणामध्ये गुंतवणूक करत आहेत. सदर इन्शुरन्स नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटे किंवा गाडीचे नुकसान झाल्यास वापरता येईल. भारतात, 1988 च्या मोटार वाहन कायद्याने मोटार कव्हर असणे अनिवार्य केले आहे.

तरीही, काही गोष्टी अशा असतात, ज्या तुमच्या मोटार इन्शुरन्समध्ये कव्हर केल्या जाऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, समजा तुमच्या कारचा एखादा भाग बदलणे आवश्यक आहे आणि जर अंतिम बिलात त्या भागाची किंमतच नाही तर तो भाग बसवण्यासाठी लागलेले अतिरिक्त श्रम शुल्क देखील आकारले आहे. अशा परिस्थितींचा विचार करून, तुमच्या बेस मोटर पॉलिसी व्यतिरिक्त, इंजिन प्रोटेक्शन कव्हर, झिरो डेप्रिसिएशन , रिटर्न टू इनव्हॉइस यासारख्या ॲड-ऑन्स योजना उपलब्ध होतात.

दैनिक भत्ता कव्हर

समजा, तुम्ही अशा भागात राहता जेथे सार्वजनिक वाहतूक करणे अवघड आहे आणि तुमची कारसुध्दा रिपैरींग साठी आहे. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या त्रासायुक्त बनतात. तुमचे वाहन दुरुस्त होईपर्यंत तुम्हाला कॅब किंवा सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणे सोपे नाही, यासाठी तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतील. अशा परिस्थितीत, दैनंदिन भत्ता ॲड ऑन कव्हर तुम्हाला 500 रू. पर्यंत भत्ता देईल. सदर भत्ता हा साधारणपणे दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी दिला जाईल, जेणेकरून तुमच्या प्रवासाचा दैनंदिन वाहतूक खर्च तुमच्या स्वतःच्या खिशातून तुम्हाला उचलावा लागणार नाही. सदर रक्कम पॉलिसीनुसार बदलते.

वैयक्तिक नुकसानाचे कव्हर

समजा, तुमची कार चोरीला जाईल किंवा तुमच्या कारसोबत तुमचे बरेच सामान चोरीला गेले. जरी तुमचा कार इन्शुरन्स तुम्हाला चोरीच्या कारसाठी कव्हर करेल, परंतु इन्शुरन्स कारमधील सामानासाठी ते कव्हर करणार नाही. ॲड ऑन इन्शुरन्स हा सदर गोष्टीसाठी फायद्याचा ठरू शकतो. माञ हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कव्हरेज मोबाइल फोन आणि लॅपटॉप संगणकांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपुरते मर्यादित आहे. ॲड ऑन खरेदी करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो तुमचा नो-क्लेम बोनस (NCB) कमी करणार नाही. ॲड-ऑन तुम्हाला मोबाईल फोनसाठी जास्तीत जास्त 25,000 रू आणि लॅपटॉपसाठी 50,000 रू चा क्लेम करण्याची परवानगी देते.

की रिप्लेसमेंट कव्हर

समजा तुम्ही तुमच्या कारची चावी हरवली, तर हे तुमच्यासाठी खूपच तणावपूर्ण असू शकते. यामुळे एखाद्याला कार निर्माण होतात तेथील अधिकृत सेवा केंद्रात जावे लागेल, जे तुमच्याकडून डुप्लिकेट चावीसाठी जास्तीचे शुल्क आकारू शकतात. अशा प्रकारचे खर्च टाळण्यासाठी, विमा कंपन्या “की रिप्लेसमेंट कव्हर” नावाचे ॲड-ऑन ऑफर करतात. या अंतर्गत, विमा कंपनी बदललेल्या चावीच्या खर्चाची भरपाई करेल. बहुतेक विमा कंपन्या नवीन लॉक बसवण्यासाठी अतिरिक्त पैसे देतील.

टायर प्रोटेक्टर मोटर कव्हर

टायर हा कारचा सर्वात महत्वाचा भाग असतो. तथापि,भारतातील रस्त्यांची परिस्थिती पाहता त्यांना सर्वात जास्त झीज सहन करावी लागते. तुमचा विमा तुम्हाला टायर झीजसाठी कव्हर करणार नाही हे लक्षात घेऊन, तुम्ही टायर प्रोटेक्टर ॲड-ऑनमध्ये गुंतवणूक करू शकता.

Comments are closed.