पुन्हा ‘ दास ‘ च! RBI च्या गव्हर्नरपदी पुन्हा शक्तीकांत दास विराजमान

Shaktikanta Das reappointed as RBI governor for another 3 years

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

सदर नियुक्ती 10 डिसेंबर 2021 पासून किंवा पुढील आदेश आल्यापासून लागू होईल, असे ACC ने म्हटले आहे.

शक्तिकांत दास (माजी सचिव, महसूल विभाग आणि वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभाग) यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता.

सदर नेमणुकीपूर्वी, ते 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य आणि भारताचे G20 शेर्पा म्हणून काम पाहत होते. त्यांच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत, दास यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्त, कर, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

अर्थमंत्रालयातील त्यांच्या कार्यकाळात ते तब्बल 8 केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याशी निगडित होते .

शक्तीकांत दास यांनी जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB), न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB), आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) मध्ये भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणून काम केले. याशिवाय, दास यांनी IMF, G20, BRICS, SAARC इत्यादी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

दास हे दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून पदव्युत्तर पदवीधर आहेत.

Comments are closed.