आता ‘ही’ कंपनी सुध्दा रिलायन्सच्या ताफ्यात, आला महत्वपूर्ण निर्णय
The Mumbai Bench of the National Company Law Tribunal (NCLT) on September 28 passed an order, inter-alia, allowing the Future Group permission to meet with its shareholders and creditors for the purpose of seeking approval for the sale of its assets to Reliance Retail Ltd.
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या मुंबई खंडपीठाने 28 सप्टेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला. NCLT ने ॲसेट विक्रीसाठी मंजुरी मिळवण्याच्या उद्देशाने, फ्युचर ग्रुपला शेअरहोल्डर आणि क्रेडिटर्सना भेटण्याची परवानगी दिली आहे.
एनसीएलटीने रिलायन्स-फ्युचर करारावर ॲमेझॉनने दाखल केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळली.
फ्यूचर ग्रुपने एका निवेदनात म्हटले आहे की, “आज न्यायालयात आदेश सुनावण्यात आला आणि त्याची एक प्रत सध्या प्रतीक्षेत आहे.”
28 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात, एनसीएलटीने फ्युचर ग्रुपला शेअरहोल्डर आणि कर्जदारांची सर्वसाधारण सभा (ईजीएम) आयोजित करण्यासाठी परवानगी दिली.
फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स या दोघांनी ऑगस्ट 2021 मध्ये जाहीर केले होते की, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) किशोर बियाणीच्या फ्युचर ग्रुप कडून 24,713 कोटी रुपयांत होलसेल, रिटेल, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग व्यवसाय विकत घेतील.
2020 मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान लॉकडाऊनचा फटका बसल्यानंतर किशोर बियाणी यांनी फ्युचर ग्रुप रिलायन्स रिटेलला विकण्याचे ठरवले.
रिलायन्स रिटेलने फ्युचर ग्रुपची रिटेल आणि होलसेल ॲसेट घेण्याची घोषणा केल्यानंतर, ॲमेझॉनने हे डील करार विरोधात आहे असे म्हंटले होते.
Comments are closed.