सॉफ्टवेअर डिग्रीवाल्यांनो तयार व्हा.. ओयो करणार भरती 

Oyo has big plans for IT recruitment

गेल्या काही महिन्यांपासून आयटी सेक्टरमधील कंपन्या मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत. यामध्ये आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. सॉफ्टबँकेने गुंतवणूक केलेली हॉस्पिटॅलिटी कंपनी OYO आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इंजिनीअरिंग, प्रॉडक्ट मॅनेजर, डिझायनर, डेटा सायंटिस्टसह अशा विविध जागांसाठी एंट्री लेव्हल ते सिनियर मॅनेजमेंटमधील जागांसाठी ही भरती असणार आहे.

 

नव्याने भरती केलेल्या डिझाइन, प्रॉडक्ट आणि इंजिनियरिंग टीम OYO साठी सध्याचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अद्ययावत करण्यासोबतच भविष्यातील दीर्घकालीन क्षमता सज्ज करण्यासाठी काम करतील. कंपनीकडून येणाऱ्या काळात अनेक नव्या कल्पना साकारल्या जाती. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना अधिक रेव्हेन्यू मिळू शकेल आणि त्यांच्या ग्राहकांनासुद्धा चांगला अनुभव मिळू शकेल. 

 

OYO कडे सध्या ५० पेक्षा जास्त प्रॉडक्ट आणि ५०० मायक्रो सर्व्हिसेसचा टेक स्टॅक आहे. यामध्ये OYO, OYO OS, Co-OYO सारखे ॲप्स तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि ऍनालिटिक्स यांचा वापर करणारे अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. या भरतीमुळे स्मॉल आणि मिड साईझ हॉटेल्सला एक परिपूर्ण टेक्नॉलॉजी सोल्युशन देणे ओयोला शक्य होणार आहे. जगात सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या ट्रॅव्हल ऍप्समध्ये ओयो तिसऱ्या क्रमांकावर आहे असा दावा कंपनीने केला आहे.

 

OYO ने याआधीच ५० पेक्षा जास्त मिड-लेव्हल आणि भारतातील अव्वल विद्यापीठांमधून सुमारे १५० कॅम्पस रिक्रूट्स यांचे ऑनबोर्डिंग सुरू केले आहे. याव्यतिरिक्त,आगामी प्लेसमेंट सीझनमध्ये सुमारे १००  नविन ऑफर दिल्या जातील.

OYO चे चीफ टेक्निकल ऑफिसर अंकित माथुरिया म्हणाले, “आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांमधील ‘गीक’ जिवंत ठेवण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही आमचे टॅलेंट लुप्त ठेवत नाही. त्याऐवजी,आम्ही त्यांना विस्तृत आणि वेगळा विचार करण्याची परवानगी देतो. आम्हाला टीमवर विश्वास आहे की ती प्रत्येक चांगली  कल्पना अमलात आणेल आणि एक टेक-फर्स्ट ग्लोबल प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या आमच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करेल.”

कंपनी इतर कर्मचाऱ्यांसोबत फ्रेशर्सनासुद्धा फिक्स्ड पेमेंट, बोनस आणि स्टॉक ऑप्शन देणार आहे. सध्या OYO हे आयटी फर्म मायक्रोसॉफ्टकडून फंडिंग मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. या फंडिंग राऊंडसाठी कंपनीचे व्हॅल्युएशन तब्बल ९ बिलियन डॉलर्स एव्हढे करण्यात आले आहे. OYO मध्ये याआधी चायनीज कंपनी दीदी, ग्रॅब, आणि अमेरिकास्थित हॉस्पिटॅलिटी फर्म एअरबीएनबी यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे.

यापूर्वी, OYO कंपनीने फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स, सिटाडेल कॅपिटल मॅनेजमेंट आणि वर्डे पार्टनर्स सारख्या जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ६६० मिलियन डॉलर्सचे डेट फंडिंग मिळवले होते. कंपनी IPO आणण्यासाठी देखील सज्ज आहे आणि जेपी मॉर्गन, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि सिटी या बँकांना यासाठी शॉर्टलिस्ट केलेले आहे.

Comments are closed.