ग्लेनमार्क लाइफ सायन्स की रोलेक्स रिंग्ज – कोणत्या आयपीओत पैसा लावावा? वाचा जाणकार काय म्हणतात
A look at Glenmark Life Science and Rolex Rings IPO
छाया कविरे
या आठवड्यात ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आणि रोलेक्स रिंग्ज हे दोन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होत आहेत. या दोनपैकी कोणत्या आयपीओची निवड करावी याबाबत जाणकारांचे काय म्हणणे आहे यावर एक नजर.
रोलेक्स रिंग्ज
ऑटो पार्ट्स निर्माता रॉलेक्स रिंग्जचा आयपीओ २८ जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि ३० जुलै पर्यंत सुरु राहील. आयपीओची अँकर बुक २७ जुलै रोजी बोलीसाठी सुरु होईल.
या दोन्ही आयपीओला रिटेल किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज आहे.
सामको सिक्युरिटीजच्या निराली शाह म्हणतात की, जास्त मूल्यांकन आणि महागाईची चिंता असूनही आयपीओबाबत बाजारात उत्साह आहे. गेल्या काही दिवसांत आलेल्या आयपीओला रिटेल इन्व्हेस्टर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याही आयपीओला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल.
सँक्टम वेल्थचे आशिष चातुरमोहता यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमधील आहेत. रोलेक्स रिंग्ज आपली उत्पादने ऑटो सेक्टरला पुरवतात तर ग्लेनमार्क लाइफ ही फार्मा आणि सीडीएमओ सेक्टरची एक कंपनी आहे. गेल्या काही वर्षांतील चांगली कामगिरी आणि ताकदवान पॅरेंट कंपनी यामुळे ग्लेनमार्कचे पारडे जड आहे.
कॅपिटलव्हीया ग्लोबल रिसर्चचे गौरव गर्ग म्हणतात की, ग्लेनमार्क लाइफच्या आयपीओ रोलेक्स रिंग्जच्या तुलनेत आघाडीवर आहे. ग्लेनमार्क लाइफकडे 120 वेगवेगळ्या एपीआयचा पोर्टफोलिओ आहे. या व्यतिरिक्त कंपनीने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार केला असून त्याचा निर्यात व्यवसायही खूप मजबूत आहे.
रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणतात की एपीआय व्यवसायात ग्लेनमार्क लाइफची चांगली ओळख आहे. त्यांचा पोर्टफोलिओ मजबूत आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून ग्लेनमार्क लाइफ चांगली गुंतवणूक ठरू शकेल.
Comments are closed.