ग्लेनमार्क लाईफ सायन्सचा आयपीओ येणार – जाणून घ्या खास गोष्टी 

Everything you need to know about Glenmark Life Science IPO

मयूर जगताप

Active Pharma Ingredients (API) म्हणजेच सक्रीय औषध घटक बनवणारी ग्लेनमार्क लाईफ सायन्स कंपनी पुढील आठवड्यात आपला आयपीओ घेऊन येत आहे. २७ जुलै ते २९ जुलै या कालावधीत तुम्ही या आयपीओसाठी अप्लाय करू शकता. Anchor Investors ( १० कोटी रुपये पेक्षा गुंतवणुक करणारे संस्थात्मक गुंतवणूकदार) साठी अर्ज २६ जुलैपासून उपलब्ध होतील. या आयपीओसाठी कंपनी १०६० करोड रुपयांचे नवे शेअर्स आणि सध्याच्या कंपनी मालकांकडील ६३ लाख शेअर्स लोकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देणार आहे.

विक्री किंमत – या आयपीओसाठी ६९५ ते ७२० रुपये या किमती दरम्यान गुंतवणूकदार बोली लावू शकतात. आयपीओमधून उभे केलेले भांडवल कंपनी कर्जाची रक्कम परतफेड करणे (८०० कोटी) आणि कंपनीच्या दैनंदिन खर्चासाठी (१५२.७६ कोटी) वापर करेल.

तुम्हाला या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी तुम्हाला २० शेअर्स खरेदी करावे लागतील, त्यासाठी तुम्हाला कमीत कमी १४,४०० रुपये गुंतवावे लागतील. सामान्य गुंतवणूकदार जास्तीत जास्त १,८५,२९९ रुपये म्हणजेच २६० शेअरच्या खरेदीसाठी बोली लावू शकतात. कोणत्याची आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदार २ लाख रुपये पेक्षा जास्त बोली लावू शकत नाहीत. कंपनीचे समभाग ५०% संस्थात्मक(QIB) गुंतवणूकदारांसाठी, १५% अ-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी(HNI) आणि ३५% सामान्य गुंतवणूकदारांसाठी असतील.

कंपनीच्या बॅलन्स शीटनुसार २०२१ या आर्थिक वर्षात ३५१.५८ कोटी रुपयांचा नफा कमावलेला आहे. याचदरम्यान कंपनीची उलाढाल १८८५.१६ कोटींवर पोहोचली आहे. यापूर्वी २०२० या आर्थिक वर्षात कंपनीला ३१३.०९ कोटींचा नफा झालेला होता आणि आर्थिक उलाढाल १५३७.३१ कोटी रुपयांची होती.  त्याचप्रमाणे २०१९ या आर्थिक वर्षात ही १९५.५९ कोटी आणि ८८६.४२ कोटी रुपयांचे क्रमाने नफा आणि आर्थिक उलाढाल होती.

ग्लेनमार्क फार्मा या औषध निर्माण कंपनीने २०१९ मध्ये त्यांच्या सक्रीय औषध घटक (API) तयार करण्याचा व्यवसाय मूळ व्यवसायापासून वेगळा केला होता. ग्लेनमार्क लाईफ या कंपनीचे लक्ष फक्त  API व्यवसायात राहील. मार्च २०२१ पर्यंतच्या माहितीनुसार कंपनी भारतात API ची विक्री करते तसेच युरोप, उत्तर अमेरिका, जपान आणि अनेक देशांत निर्यात ही करते. जास्त काळ चालणाऱ्या आजारांवर उपचार होणाऱ्या औषधांच्या सक्रीय औषध घटकांचे उत्पादन ही कंपनीची जमेची बाजू आहे.

प्रवर्तक आणि व्यवस्थापक
ग्लेनमार्क फार्मा ही ग्लेनमार्क लाईफ कंपनीची प्रवर्तक कंपनी आहे. ग्लेन सालदानहा हे कंपनीचे चेअरमन आणि नॉन एक्झक्युटिव्ह डायरेक्टर आहेत.  त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले आहे. त्यांनी औषधनिर्माण विज्ञान याविषयात पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी न्यूयॉर्क विद्यापिठातून व्यवसाय व्यवस्थापन याचात उच्य पदवी प्राप्त केली आहे.
वी एस मनी हे कंपनीचे नॉन एक्झक्युटिव्ह डायरेक्टर आहेत आणि ते चार्टर्ड अकाउंटंड आहेत. त्यापूर्वी ते भारतीय सिटी डेव्हलपर चे अध्यक्ष होते.

आयपीओ लिस्टिंग 

कंपनीचा समभागांचे वाटप ३ ऑगस्टला होणार आहे. जर तुम्हाला समभागाचे वाटप नाही झाले तर ४ ऑगस्टला तुमचे पैसे माघारी मिळतील. ज्यांना समभाग मिळतील त्यांच्या डिमॅट खात्यात ते ५ ऑगस्टला जमा होतील. BSE आणि NSE या शेअर बाजारात ते ६ ऑगस्टला सूचीबद्ध होतील.

Comments are closed.