ग्लेनमार्क लाइफ सायन्स की रोलेक्स रिंग्ज – कोणत्या आयपीओत पैसा लावावा? वाचा जाणकार काय म्हणतात

A look at Glenmark Life Science and Rolex Rings IPO

छाया कविरे

या आठवड्यात ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आणि रोलेक्स रिंग्ज हे दोन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होत आहेत. या दोनपैकी कोणत्या आयपीओची निवड करावी याबाबत जाणकारांचे काय म्हणणे आहे यावर एक नजर.

ग्लेनमार्क लाइफ सायन्स API कंपनी ग्लेनमार्क लाइफ सायन्सचा आयपीओ आजपासून सुरु झाला आहे आणि २९ जुलैपर्यंत या आयपीओसाठी अप्लाय करता येणार आहे. या आयपीओद्वारे कंपनी १०६० कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू करेल तर ६३ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जातील.  या आयपीओसाठी प्राईझ बँड ६९५-७२० रुपये आहे. आयपीओमधून उभ्या राहणाऱ्या निधीचा उपयोग कंपनी डेट कमी करण्यासाठी आणि रोजच्या कामकाजासाठी रोजच्या कामकाजासाठी खर्च केले जातील.

रोलेक्स रिंग्ज 

ऑटो पार्ट्स निर्माता रॉलेक्स रिंग्जचा आयपीओ २८ जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि ३० जुलै पर्यंत सुरु राहील. आयपीओची अँकर बुक २७ जुलै रोजी बोलीसाठी सुरु होईल.

या आयपीओचा प्राईझ बँड  ८८०-९०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओद्वारे कंपनी ७३१ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. कंपनी या आयपीओच्या रकमेचा उपयोग लॉंग टर्म वर्किंग कॅपिटल म्हणून आणि कंपनीच्या इतर गरजांसाठी करेल. सन २०२१ मध्ये येणारा हा २९ वा आयपीओ असेल.बाजाराचा मूड काय आहे?

या दोन्ही आयपीओला रिटेल किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज आहे.

सामको सिक्युरिटीजच्या निराली शाह म्हणतात की, जास्त मूल्यांकन आणि महागाईची चिंता असूनही आयपीओबाबत बाजारात उत्साह आहे. गेल्या काही दिवसांत आलेल्या आयपीओला रिटेल इन्व्हेस्टर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याही आयपीओला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल.

जरी दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रातील असल्या तरी विश्लेषकांचा ओढा मात्र ग्लेनमार्क लाइफकडे जास्त दिसतो आहे. एपीआय सेक्टरमधील कंपनीचा व्यवसाय हे त्यासाठी एक प्रमुख कारण मानले जात आहे.

 

सँक्टम वेल्थचे आशिष चातुरमोहता यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमधील आहेत. रोलेक्स रिंग्ज आपली उत्पादने ऑटो सेक्टरला पुरवतात तर ग्लेनमार्क लाइफ ही फार्मा आणि सीडीएमओ सेक्टरची एक कंपनी आहे. गेल्या काही वर्षांतील चांगली कामगिरी आणि ताकदवान पॅरेंट कंपनी यामुळे ग्लेनमार्कचे पारडे जड आहे.

कॅपिटलव्हीया ग्लोबल रिसर्चचे गौरव गर्ग म्हणतात की, ग्लेनमार्क लाइफच्या आयपीओ रोलेक्स रिंग्जच्या तुलनेत आघाडीवर आहे. ग्लेनमार्क लाइफकडे 120 वेगवेगळ्या एपीआयचा पोर्टफोलिओ आहे. या व्यतिरिक्त कंपनीने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार केला असून त्याचा निर्यात व्यवसायही खूप मजबूत आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणतात की एपीआय व्यवसायात ग्लेनमार्क लाइफची चांगली ओळख आहे. त्यांचा पोर्टफोलिओ मजबूत आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून ग्लेनमार्क लाइफ चांगली गुंतवणूक ठरू शकेल.

Comments are closed.