केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय – बीपीसीएलच्या विक्रीसाठी नियमांत केला बदल 

Cabinet appoves 100% FDI for BPCL Stake Sell

भारत पेट्रोलियमच्या विक्री प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मंजूर करण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाचा मार्ग सुलभ होईल असे सरकारला वाटते. सध्या खासगी रिफायनरी कंपन्यांमध्ये संपूर्ण एफडीआयसाठी परवानगी आहे, तर सरकारी कंपन्यांमध्ये ही भागीदारी ४९:५१ च्या प्रमाणात असू शकते. यात सरकारकडे निर्णायक जबाबदारी असते.
सीनएनबीसी आवाजच्या सुत्रांनुसार, सरकारला आता बीपीसीएलमधून पूर्णपणे बाहेर पडायचे आहे. बीपीसीएलमध्ये १००% थेट विदेशी गुंतवणूकीस परवानगी देण्याकरिता नियमांमध्ये काही बदल आवश्यक आहेत. सरकारी कंपनीत एफडीआयला परवानगी दिल्याने बोली लावणाऱ्यांची संख्या वाढेल आणि खासगीकरणाच्या प्रकियेला मदत मिळेल. केंद्र सरकारने बीपीसीएलमधील आपला संपूर्ण हिस्सा एका खासगी कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. हा सरकारच्या मालमत्ता विक्री करून कमाई कमावण्याच्या योजनेचा एक भाग आहे. ती खरेदी करणार्‍या खासगी कंपनीकडे सर्व बीपीसीएलचे सर्व अधिकार असतील.

यंदाच्या गुंतवणूकीचे लक्ष्य गाठण्यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे. एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या होणाऱ्या लाभांमध्ये घट करण्यात येत आहे. याद्वारे बोली लावणाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी एअर इंडियाची विक्री करण्याचा प्रयत्न झाला.  परंतु, यामध्ये कोणी फारसा रस दाखविला नाही. आता या निर्णयाचा भारत पेट्रोलियमच्या विक्रीवर कसा परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Comments are closed.