सही हैं! पन्नास पैशांची नाणी गोळा करा अन् लखपती व्हा, कसं ते जाणून घ्या एका क्लिकवर

आपल्यापैकी काही जणांना जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असतो. बरीच लोकं अशा छंदांना नावेही ठेवताना आपण बघतो. पण यापुढे तुम्हाला नक्कीच काहीसे वेगळे चित्र बघायला मिळणार आहे; कारण २०११ मधली ५० पैशांची नाणी तुम्हाला लखपती बनवून देणार आहेत.

तसे बघायला गेले तर आज काल ५० पैशांमध्ये तर सोडाच पण १ रुपयांमध्ये सुद्धा काहीच मिळत नाही. पण काळ कसा बदलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०११ ची सनावळी असलेली ५० पैशांची नाणी. आता हीच नाणी तुमचे भविष्य पूर्ण बदलून तुम्हाला लखपती करू शकतात.

पण ही नाणी मी विकू तरी कुठे?
OLX हे असं माध्यम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वस्तूंची खरेदी विक्री करू शकता. हळू हळू या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ५० पैशांची नाणी विकण्याचा ट्रेंड आला आहे. अशा प्रकारची नाणी मिळवण्यासाठी लोकं लाखो रुपये द्यायला तयार आहेत. आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल कि रिझर्व बँकेने २०११ मध्ये ५० पैशांची नाणी बनवणे बंद केले होते. वाढत्या महागाईमुळे २५ पैशांची नाणी देखील बंद झाली, कालांतराने ५० पैशांच्या नाण्याचा वापरही खूप कमी होत गेला.

जर तुमच्याकडे अश्या प्रकारची ५० पैशांची नाणी असतील तर तुम्ही OLX वर ती विकू शकता. यासाठी तुम्हाला OLX वर नावनोंदणी करावी लागेल. त्यानंतर ५० पैशांच्या नाण्याचा दोन्ही बाजूचे छायाचित्र (फोटो) काढून ते फोटोस अपलोड करावे लागेल. एकदा अपलोड झालेले फोटो जर लोकांना आवडले, तर तुम्ही ५० पैशांपासून अनेक रुपये कमावू शकता.

 

Comments are closed.