भारीच की! अजून एक IPO येणार, गुंतवणूकदारांनो लागा तयारीला

गो फॅशनने त्यांच्या 1,014 कोटीच्या IPO साठी 655-690 प्रति शेअरची किंमत निश्चित केली आहे. IPO सबस्क्रिप्शनसाठी 17 नोव्हेंबर रोजी उघडेल आणि 22 नोव्हेंबर रोजी संपेल.

विविध प्रकारचे कापड उत्पादने निर्माण करणारी कंपनी गो फॅशन IPO आणण्याची तयारी करत आहे.यासाठी कंपनीने किंमत बँड देखील ठरवले आहेत.

गो फॅशनने त्यांच्या 1,014 कोटीच्या IPO साठी 655-690 प्रति शेअरची किंमत निश्चित केली आहे. IPO सबस्क्रिप्शनसाठी 17 नोव्हेंबर रोजी उघडेल आणि 22 नोव्हेंबर रोजी संपेल.

गो फॅशनच्या IPO मध्ये 125 कोटी पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि प्रमोटी आणि विद्यमान स्टेकहोल्डरद्वारे 12,878,389 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) उपलब्ध आहे.

आज ग्रे मार्केटमध्ये गो फॅशनचे शेअर्स वाढले आहेत आणि 540 चा मजबूत प्रीमियम आहे. कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2021 रोजी स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.

ब्रोकरेज फर्म अँगेल नुसार, “गो फॅशन इंडियाचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. महसूल वाढ, उच्च ऑपरेटिंग मार्जिन आणि TCNS च्या तुलनेत इक्विटीवर उच्च परतावा या सर्व सकारात्मक बाबी लक्षात घेऊन आम्ही यावर सबस्क्रिप्शन घेण्याची शिफारस करत आहोत.

गो फॅशन (इंडिया) लिमिटेड हा भारतातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक आहे. कंपनी ‘गो कलर्स’ या ब्रँड अंतर्गत महिलांच्या बॉटम-वेअर उत्पादनांच्या श्रेणीच्या विकास, डिझाइन, सोर्सिंग, मार्केटिंग आणि किरकोळ विक्रीमध्ये गुंतलेली आहे.

गो फॅशन ब्रँड आउटलेट्स (एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स किंवा EBOS) 30 सप्टेंबर 2021 पर्यंत भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत, गो फॅशनचे 118 शहरांमध्ये 459 EBOS होते.

फ्रेश इश्यूमधून मिळालेले उत्पन्न 120 नवीन स्पेशल ब्रँड आउटलेटच्या रोल आउटसाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि जनरल कॉर्पोरेट गोष्टीना समर्थन देण्यासाठी वापरले जातील.

Comments are closed.