तुमचे अमेरिकेतील नातेवाईक-मित्रही आता गुगल पे ॲपवरुनही करु शकतात तुम्हाला पैसे ट्रान्सफर, कसं ते घ्या जाणून

अमेरिकेतील गुगल पे युझर्स यापुढे भारत व सिंगापूर देशातील गुगल पे युझर्सला पैसे ट्रान्सफर करु शकतात. अमेरिकेत गुगल पे ॲपने आंतरराष्ट्रीय पेमेंट्स व मनी ट्रान्सफरसाठी घेतलेला हा मोठा निर्णय बोलला जात आहे. गुगल पे ॲपने यासाठी (Western Union) बरोबर पार्टनरशीप केली आहे.

यामुळे २०२१ या वर्षाच्या शेवटीपर्यंत गुगल पे वापरकर्ते हे जवळपास २०० देशांत एकमेकांना पैसे ट्रान्सफर करु शकतात. यासाठी गुगल पे अन्य पेमेंट प्लॅटफॉर्मसोबत सध्या एॅग्रीमेंट करत आहे. भारत देशातून होणार आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफर हे वेस्टर्न युनियन द्वारा होईल, असे बोलले जात आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मची ज्या देशात आहे, तेथे हा पर्याय सहज निवडता येणार आहे.

गुगल पे वरुन पैसे ट्रान्सफर करणे अतिशय सोपी प्रक्रिया आहे. यासाठी अमेरिकेत असलेले आपले नातेवाईक किंवा मित्र आधीप्रमाणेच गुगल पे ॲपवर तुमचा मोबाईल क्रमांक शोधून हे पैसे ट्रान्सफर करु शकतात. यासाठी तुमचा नंबर गुगल पे व बॅंकेसोबत जोडलेला असणे गरजेचे आहे. अमेरिकेतून केवळ अमेरिकन डॉलरमध्ये हे पैसे पाठवता येऊ शकतात. यानंतर वेस्टर्न युनियन व वाईजमधून तुम्हाला एक पर्याय निवडता येऊ शकतो. यामुळे अमेरिकेतील गुगल पे वापरकर्त्यांना सहज समजेल की पैसे ट्रान्सफर व्हायला किती वेळ लागेल. तसेच करन्सी कन्वर्जन्सनंतर भारतीय गुगल पे वापरकर्त्याच्या हातात किती रुपये मिळणार आहेत हेही ट्रान्सफर करताना समजेल.

यानंतर ट्रान्सफऱ केलेले पैसे थेट भारतीय गुगल पे वापरकर्त्याच्या खात्यात जमा होतील. अमेरिकन गुगल पे वापरकर्ते आपल्या गुगल पे ॲपला लिंक केलेल्या क्रेडिट कार्डद्वारेही हे पैसे पाठवू शकतात. यासाठी वापरकर्त्यांना कोणतीही कमीत कमी रक्कम ठरवून दिलेली नाही. परंतू जास्तीत जास्त रक्कम ही मात्र पेमेंट कोणत्या प्रकारातून करणार आहे, त्यावर अवलंबून आहे. वेस्टर्न युनियनने सांगितले आहे की, जुन महिन्याच्या मध्यापर्यंत अशा पैसे ट्रान्सफर करण्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. गुगल पे कडून पैसे पाठविण्यासाठी किंवा स्विकारण्यासाठी कोणतेही चार्जेस आकारले जाणार नाहीत.

नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, गेल्या एका वर्षात जवळपास २५ कोटी लोकांनी ५०० अरब डॉलरपेक्षाही अधिक पैसे अशा माध्यमातून ट्रान्सफर केले आहेत. याच रिपोर्टनुसार आंतररराष्ट्रीय मनी ट्रान्सफरचे चार्जेस हे खूप आहेत. जवळपास ६.५ टक्के रक्कम ही मुळ रकमेच्या यासाठी आकारली जाते.

Comments are closed.