महत्त्वाचे- देशात आज आणि उद्या ‘या’ शहरांत राहणार बॅंका बंद, पाहा संपुर्ण यादी

bank holidays may 2021 banks will remain closed in these cities of the country on 13 and 14 may see the complete list

भारत देशात कोरोना महामारीमुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींवर सरकारने निर्बंधही घातले आहेत. यातच आता ईदचा मोठा सन शुक्रवारी अर्थात १४ मे रोजी आला आहे. यामुळे वेगवेगळ्या राज्यात या सणानिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या वतीने ईदची सुट्टी १३ मे रोजी बँकांना घोषीत केली आहे. परंतू ही सुट्टी काही शहरांत १४ मे रोजी दिली जाणार आहे. आरबीआयच्या निगोशिएबल ॲक्ट अंडर ही सुट्टी घोषीत करण्यात येत आहे.

१३ मे रोजी या शहरांत असणार बँकांना सुट्टी-
बेलापुर, जम्मू, कोची, मुंबई, नागपुर, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम

१४ मे रोजी या शहरांत असणार बँकांना सुट्टी
१४ मे रोजी देशात ईद सणाबरोबरच अक्षय तृतीयेसारखा मोठा सण आला आहे. यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागांत बँकांना सुट्टी असणार आहे. या दिवशी अगरतळा, अहमदाबाद, आइजोल, बेंगलुरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, जयपुर, कानपुर, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पणजी, पटना, रायपुर, रांची, शिलांग आणि शिमला शहरांत बँका बंद राहणार आहेत.

याशिवाय २६ मे रोजी बौद्ध पौर्णिमा असल्यामुळे बँका बंद असणार आहे. १६ मे व २३ मे रोजी रविवार असणार आहे तर २२ मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. याचबरोबर ३० मे रोजी महिन्याचा शेवटचा रविवार आहे. तेव्हाही बँका बंद राहतील. यामुळे ग्राहकांनी या वेळापत्रकाचा विचार करुनच बँकेच्या कामाचे नियोजन करणे सांयुक्तिक ठरणार आहे

Comments are closed.