गाडीची फ्री सर्व्हिस एक्स्पायर होण्याची भीती आता नाही, कंपन्या देतायत एक्सटेंशन
Maruti Suzuki and Tata Motors extend free service and warranty for their customers
करोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात धुमाकूळ घातला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याचा परिणाम सामान्य नागरिक तसेच कार्पोरेट क्षेत्रावरही होताना दिसतोय. अशातच ज्या लोकांनी नव्या गाड्या घेतल्या आहेत त्यांना वेगळीच चिंता लागली आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या नव्या गाडीची फ्री सर्व्हिस एक्स्पायर होते की काय अशी भीती या ग्राहकांना वाटत आहे. ग्राहकांची हीच भीती विचारात घेऊन कंपन्यांनी आता त्यांना दिलासा दिला आहे.
मारुती सुझुकी तसेच टाटा मोटर्ससारख्या आघाडीच्या ब्रॅण्ड्सने आपल्या ग्राहकांना फ्री सर्व्हिस आणि वॉरंटीसाठी एक्सटेंशन दिले आहे. मारुतीच्या ज्या ग्राहकांच्या फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी १५ मार्च २०२१ ते ३१ मे २०२१ दरम्यान संपणार होत्या त्यांना ही स्कीम लागू होणार आहे. या ग्राहकांची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी ३० जून २०२१ पर्यंत कायम राहणार आहे.
मारुतीच्या आधी मंगळवारी टाटा मोटर्सनेसुद्धा आपल्या ग्राहकांना फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी ३० जून २०२१ पर्यंत कायम राहणार असल्याचे जाहीर केले होते. ज्या ग्राहकांच्या फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी १ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ दरम्यान संपणार होत्या त्यांना ही स्कीम लागू होणार आहे. देशात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ग्राहकांना आपल्या गाड्या सर्व्हिस सेंटरला घेऊन येणे शक्य नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.