आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर किती येतो खर्च? जाणून घ्या एका क्लिकवर!

आधार कार्ड अर्थात Unique Identification Authority of India -UIDAI हा भारतीय नागरिकांना दिला गेलेला एक विशिष्ट क्रमांक आहे. या १२ अंकी क्रमांकावर नागरिकांची ओळख होते. भारतीयांकडून आधार कार्डचा वापर हा ओळख व पत्ता यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

आपण यात काही बदल करायचे असेल तर ऑनलाईन एनरॉलमेंट सेंटरवर जावून ते बदल करु शकतो. परंतू जर बायोमेट्रिक अपडेट जर करायच्या असतील तर आपल्याला जवळच्या आधार परमनंट एनरॉलमेंट सेंटरला(Aadhaar Permanent Enrolment center) जावेच लागते.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला ओरीजनल कागदपत्रे बरोबर घेऊनच आधार परमनंट एनरॉलमेंट सेंटरला जावे लागते. ओरिजनल कागदपत्रांची छाननी करुन लगेच तुम्हाला ती परत केली जातात. जर तुम्हाला Self Service Update Portal (SSUP) याचा वापर करुन जर पत्त्यात बदल करायचा असेल तर तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक आधारशी जोडलेला असणे गरजेचे असते.

आधार कार्ड कधी अपडेट केलं पाहिजे?
जर तुमच्या पत्त्यामध्ये काही बदल झाला असेल तर तुम्हाला आधार कार्डवरील पत्ता अपडेट करणे गरजेचे आहे. यामुळे कार्डवर तुमचा कायम अपडेटेड पत्ता दिसतो. जर तुम्हाला आधार कार्डवरील फोटो, बायोमेट्रिक, लिंग, भ्रमणध्वनी क्रमांक किंवा ईमेल आयडी बदलायचा असेल तर यासाठी कागदपत्रांची गरज पडत नाही.

हेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किती रुपये लागतात?
जर तुम्हाला बायोमेट्रिक अपडेट करायचे असतील तर त्यासाठी १०० रुपये खर्च येतो. जर पत्त्यामध्ये बदल करायचा असेल तर ५० रुपये खर्च येतो. जर तुम्हाला e-Aadhaar download व रंगीत प्रींट हवी असेल तर ३० रुपये खर्च येतो. जर यापेक्षा वेगळे पैसे कुणी मागत असेल तर १९४७ या क्रमांकावर फोन करुन तुम्ही तक्रार करुन शकता किंवा help@uidai.gov.in या ईमेल आयडीवर मेलही करु शकता.

Comments are closed.