हा स्मॉल कॅप शेअर देतोय इन्व्हेस्टर्सला ‘कॉन्फिडन्स’ 

This small-cap company is turning out to be investors' favorite

नागपूरला कॉन्फिडन्स पेट्रोलियम नावाची एक कंपनी आहे. साधारण १७००-१७५० कोटींची मार्केट कॅप असलेली ही स्मॉल कॅप कंपनी गेल्या काही दिवसांत अनेक इन्व्हेस्टर्सचे लक्ष वेधून घेते आहे. नावावरूनच कंपनीच्या बिझनेसबद्दल कल्पना येत असली तरी कंपनी नक्की काय करते? येणाऱ्या काळात त्यांच्या काय योजना आहेत? मुख्य म्हणजे कंपनीच्या शेअरबद्दलची माहिती या लेखातून देतोय.

कंपनीने १९९५-९६ मध्ये व्होल्टाज कंपनीचा एक सिलिंडर मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट विकत घेऊन आपल्या बिझनेसला सुरुवात केली. त्यानंतर लगेचच १९९८ मध्ये नागपूरमधील कोसन इंडस्ट्रीजचे एक युनिट आणि अंकलेश्वर, भोपाळ येथे एक एक युनिट असा आपला बिझनेस वाढवत नेला. आजघडीला एलपीजी सिलिंडर मॅन्युफॅक्चरिंगसाठी कंपनीची एकूण १६ युनिट्स आहेत. सध्याची सिलिंडर मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी दर वर्षाला ५० लाख  सिलिंडर एवढी आहे. हे सिलिंडर एचपी, इंडियन ऑइल,रिलायन्स, एजिस सारख्या नावाजलेल्या कंपन्यांना पुरवले जातात. हे सगळे सिलिंडर मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट्स कंपनीच्या स्वतःच्या मालकीचे आहेत. यात कोणाशी भागीदारी, भाडे करार किंवा लीज करार नाहीत ही जमेची बाब आहे.

यांनतर बिझनेस एक्स्पान्शन म्हणून कंपनीने एलपीजी बॉटलिंग प्लॅन्ट्समध्ये उडी घेतली. त्यांना यामध्ये चांगला प्रतिसादही मिळाला आणि आजघडीला भारतभरात कंपनीचे एकूण ५८ एलपीजी बॉटलिंग प्लॅन्ट्स आहेत. यानंतर कंपनी एलपीजी रिटेलिंग बिझनेसमध्ये सुद्धा आली. सध्या कॉन्फिडन्स ग्रुप अंतर्गत कंपनी आपला बिझनेस चालवते. हा बिझनेस प्रामुख्याने तीन सेगमेंटमध्ये विभागाला गेला आहे.

१. सिलिंडर मॅन्युफॅक्चरिंग

२. एलपीजी बॉटलिंग

३. एलपीजी रिटेलिंग – यात पुन्हा पॅक्ड सिलिंडर आणि ऑटो एलपीजी स्टेशन्स अशी विभागणी आहे.

ऑटो एलपीजी सेगमेंटमध्ये कंपनी भारतातील निवडक कंपन्यांपैकी एक आहे. आजघडीला कंपनीचे २०९ एलपीजी डिस्पेंसिंग स्टेशन्स आहेत. हे २०९ स्टेशन्स कंपनीने अवघ्या चार वर्षांत उभे केले आहेत. येणाऱ्या ४ वर्षांत एलपीजी डिस्पेंसिंग स्टेशन्सची संख्या ५०० पर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस आहे. या २०९ ऑटो एलपीजी डिस्पेंसिंग स्टेशन्सपैकी १४ भागीदारीत असून इतर सर्व कंपनी स्वतः चालवते. या सेगमेंटमध्ये सुपरगॅस, टोटल, एजिस सारख्या कंपन्या कॉन्फिडन्सच्या स्पर्धक आहेत.

आता कंपनीने सीएनजी सेक्टरवर आपले लक्ष वळवले असून नागपूरजवळ स्वतःचा सीएनजी सिलिंडर मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट सुरु करणार आहे. या प्लॅन्टची कपॅसिटी वर्षाला ३ लाख ६० हजार सिलिंडर एवढी असेल. दहेज येथील एक सीएनजी सिलिंडर मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टदेखील कंपनीने नुकताच विकत घेतला. याबरोबरच कंपनीने नुकतेच गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच गेल या कंपनीबरोबर बंगलोर शहरात १०० सीएनजी स्टेशन्स उभारण्यासाठी करार केला आहे. ही १०० स्टेशन्स उभारण्यासाठी कंपनीला  २ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. बंगलोरमधील या कामाबरोबरच भारतभरात एकूण ५०० सीएनजी स्टेशन्स उभारण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. यासाठी गेल आणि इतर गॅस डिस्ट्रिब्युशन कंपनीज बरोबर करार करता येईल असे कंपनी व्यवस्थापनाला वाटते.

यासाठी गेलबरोबरच इतरही कंपन्या कॉन्फिडन्सला प्राध्यान्य का देतील?
मुळात सीएनजी स्टेशन सुरु करायचे म्हणजे भरपूर किचकट प्रक्रिया आहे. यासाठी वेगवेगळे परवाने, एनओसी, अप्रूव्हल्स लागतात. ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ आहे. कॉन्फिडन्सला हे सगळे करण्याचा अनुभव आहे. नेमका याचाच त्यांना फायदा होऊ शकतो.

कंपनीने महाराष्ट्रातील एमएनजीएलबरोबर पुणे शहरात सीएनजी डिस्ट्रिब्युशनसाठी करार केला आहे. याबरोबरच इंदोर, ग्वालीयर, उज्जैन यासारख्या शहरात सीएनजी डिस्ट्रिब्युशनसाठी कंपनीने अवंतिका गॅस लिमिटेडबरोबर करार केला आहे.

हे सगळे बिझनेस एक्स्पान्शन करण्यासाठी अर्थातच मोठ्या निधीची गरज लागणार आहे. यासाठी सुरुवातीच्या २ वर्षांत साधारण ३५० कोटींच्या निधीची गरज लागणार आहे. कंपनी डेट फ्री आहे. गरज पडल्यास कर्ज घेऊन हा निधी उभारण्याची कंपनीची तयारी आहे.

कंपनीच्या प्रमोटर्सकडे कंपनीची ५७% मालकी आहे तर उरलेली ४३ टक्के मालकी पब्लिक आहे. मार्च २०२० मध्ये प्रमोटर्सकडे कंपनीची ५३.५९% मालकी होती. गेल्या एक वर्षांत त्यांनी आपली मालकी वाढवली आहे. प्रमोटर्सने ओपन मार्केटमधून हे शेअर्स विकत घेतले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रमोटर्स होल्डिंग प्लेज १.२८% वरून १.१५% पर्यंत कमी झाली आहे. कंपनीचा प्रॉफिट मार्च २०२० मध्ये ३.९४ कोटी ते डिसेंबर २०२० मध्ये १९.४० कोटींपर्यंत वाढला आहे.

कंपनीच्या शेअरने गेल्या सहा महिन्यांत २६ रुपये ते ६४ रुपये एवढा मोठा टप्पा पार केला आहे. वॉर उल्लेख केलेले बिझनेस एक्स्पान्शन प्लॅन्स, कंपनी व्यवस्थापनाचे दूरगामी धोरण, याला असलेली तत्रंज्ञानाची आणि मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटीची जोड, केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्वला योजना या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर येणाऱ्या काळात कंपनीची वाटचाल आश्वासक असेल असे वाटते. कारण कंपनीच्या नावातच ‘मूव्हिंग विथ कॉन्फिडन्स’ आहे.

Comments are closed.