इकडे आड, तिकडे विहीर! टुव्हीलर उत्पादकांचे टेन्शन वाढले, ‘या’ कारणामुळे सापडलेत संकटात

Covid 19 impact rising costs closed showrooms begin to hurt motorcycle makers

अनेक शोरुम लॉकडाऊनमुळे बंद झाल्यामुळे व ग्राहकांकडून अनियमित मागणीमुळे या चौमाहित टुव्हीलर उत्पादकांसमोर इच्छित लक्ष न गाठण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. लॉकडाऊनमुळे गाड्यांच्या सुट्या भागाचे व रॉ मटेरियलचे वाढते भाव ही दोन मोठी संकटंही उत्पादकांच्या समोर आ वासून उभी राहिली आहेत.

सध्या देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, गोवा, तामिळनाडू व कर्नाटक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. ही राज्य देशातील प्रमुख व मोठी राज्य आहेत. याच लॉकडाऊनचा मोठा फटका टुव्हीलर उत्पादकांना बसणार आहे. महिन्यात साधारणत: १२ ते १३ लाख टुव्हिलर देशात नोंदणी होतात. एप्रिल २०२१मध्ये ही नोंदणी केवळ ८ लाख ६५ हजार गाड्यांची झाली. एप्रिल महिन्यात शेवटच्या काही आठवड्यांत लॉकडाऊन लावले गेले. मात्र मे महिन्यात जवळपास सर्वत्र लॉकडाऊन दिसत आहे.

गाड्यांचे उत्पादन करणे हे उत्पादकांसमोर आव्हान नसुन गाड्यांची विक्री न होणे हे मोठे आव्हान आहे. देशातील प्रमुख राज्यात लॉकडाऊन असल्याने एप्रिल महिन्यात ३० टक्क्यांच्या आसापास शोरुम बंद होते. याचा थेट परिणाम गाड्यांच्या विक्रीवर झाला. याचमुळे पहिल्या चौमाहित कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे.

३४ टक्के मार्केट शेअर असलेल्या हिरो मोटोकॉर्प कंपनीने आपले उत्पादन थांबवले असून ते १६ मेपर्यंत सुरु न होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच त्यांनी आपले उत्पादन बंद केले आहे. मे महिन्याच्या मध्यावर देशात कोरोनाचे पेशंट वाढण्याची शक्यता वर्तविल्यामुळे कदाचीत कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

गाड्यांची विक्री हे एकच आव्हान कंपन्यासमोर नसुन कच्च्या मालाची वाढलेली किंमत हे देखील एक मोठे संकट आहे. स्टीलच्या किंमतीने कधीच आकाशाला गवसणी घातली असून बाकी रहोडियम, प्लॅटिनम आणि पल्लाडियमच्या किंमतीही १०० ते २०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतीत १ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचे वृत्त आहे.

Comments are closed.