HCL टेक्नॉलॉजीचा Q2 रिझल्ट आला, किती नफा?किती तोटा? पहा एका क्लिकमध्ये

भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर सोल्यूशन कंपन्यांपैकी एक एचसीएल टेक्नॉलॉजीजने सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत 3,265 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे, जो मागील तिमाहीतील 3,214 कोटी रुपयांच्या तुलनेत 1.6 टक्क्यांनी वाढला आहे. हाच आकडा गेल्यावर्षी याच तिमाहीत 3,142 कोटी होता. जून 2021 तिमाहीत 20,068 कोटी रुपयांच्या तुलनेत, ह्या तिमाहीत एकत्रित महसूल 20,655 कोटी रुपयांवर आला आहे.

या तिमाहीत कंपनीचा डॉलर रेव्हेन्यू 2,791 मिलियन एवढा झाला. हा रेव्हेन्यू QOQ बेसिसवर 2.6% आणि YOY बेसिसवर 11.3% ने वाढलेला आहे. तर गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत 10.5% च्या CAGR ने वाढला आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा ​​म्हणाल्या, “आम्ही ‘द न्यू एसेन्शियल’ वर विश्वास ठेवतो. येणाऱ्या काळात, आम्ही एकत्रितपणे मजबूत आणि चांगले भविष्य घडवण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान, लोक आणि ईएसजी मध्ये आमच्या गुंतवणूकीला गती देऊ.”

संपूर्ण व्यवसायात झाली वाढ

एकूण उत्पन्नात आयटी आणि व्यवसाय सेवांनी 72.6% योगदान दिले आहे. इंजिनीअरिंग आणि आर अँड डी सेवांनी 15.7% योगदान दिले, तर 11.7% उत्पन्न हे प्रॉडक्ट आणि प्लॅटफॉर्म व्यवसायातून मिळाले. सीसीच्या दृष्टीने आयटी आणि व्यवसाय सेवांची वाढ QOQ आधारावर अनुक्रमे 5.2% आणि 5.4% होती. प्रॉडक्ट आणि प्लॅटफॉर्म व्यवसायाने 8% ची घट नोंदविली. एकत्रित महसूल 5.2% QOQ आणि 13.15 YOY ने वाढला.

एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सी विजयकुमार म्हणाले, “या तिमाहीत आम्ही आमच्या डिजिटल बिझनेस, इंजिनीअरिंग आणि क्लाउड सेवांच्या नेतृत्वाखाली सर्व्हिस पोर्टफोलिओ मजबूत केला आहे.” लाइफसायन्सेस आणि हेल्थकेअर (20.1% YoY cc), टेलिकॉम, मीडिया, एन्टरटेन्मेंट आणि पब्लिशिंग (13.4% YoY cc), मॅन्युफॅक्चरिंग (11.9% YoY cc), टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिसेस (10.8% YoY cc) इतकी ग्रोथ झाली.

 

पुरेसा मार्जिन 

EBITDA मार्जिन हा 23.4% होता, जो 140 bps QOQ आणि 230 bps YOY ​​ने कमी होता. या तिमाहीत कमी मार्जिन असूनही, कंपनीसाठी EBITDA गेल्या 5 वर्षांमध्ये 13.9% च्या CAGR मध्ये वाढला आहे. EBIT मार्जिन 19% वर होता, जो 40 bps QOQ आणि 250 bps YOY ​​ने कमी होता. दरम्यान कंपनी आपला निव्वळ मार्जिन 15.8% पर्यंत सुधारण्यात यशस्वी झाली, यात 120 बीपीएस QOQ आणि 400 बीपीएस YOY चा समावेश होता.

HCL टेक्नॉलॉजीने सप्टेंबर 2021च्या तिमाहीत अनेक करार केले आहेत, ज्यात एमकेएस इन्स्ट्रुमेंट्ससह पाच वर्षांचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करार, वेकर केमी एजीसह आणखी पाच वर्षांचा आयटी ट्रान्सफॉर्मेशन करार, 40 देशांमध्ये डिजिटल वर्कप्लेस सेवा देण्यासाठी म्यूनिच आरईसह करार, आणि ऑपरेशनल स्थिरतेला समर्थन देण्यासाठी रॉजर्ससह बहुवार्षिक करार यांचा यात समावेश आहे.

कंपनीमध्ये 11,135 कर्मचाऱ्यांची निव्वळ भर पडली आहे जी गेल्या 24 तिमाहींमध्ये सर्वाधिक आहे. एकूण कर्मचारी संख्या आता 187,634 कर्मचारी आहे. विजयकुमार म्हणाले, “आमची मजबूत पाईपलाईन आणि कर्मचारी आमच्या व्यवसायाची गती चांगल्या प्रकारे वाढवत आहेत.

कंपनीने तिमाहीत 465 मिलियन डॉलरचा ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि 390 मिलियन डॉलरचा फ्री कॅश फ्लो निर्माण केला आहे. या तिमाहीच्या अखेरीस एकूण कॅश 2,696 मिलियन डॉलर आणि निव्वळ कॅश 2,171 मिलियन डॉलर आहे.कंपनीने Q2 साठी प्रति शेअर 10 रू.चा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीकडून लाभांश देण्याची ही सलग 75 वी तिमाही आहे.

Comments are closed.