सरकारने टाकला शेवटचा पत्ता, आता तरी खाद्यतेलाचे भाव उतरणार का?

सेंट्रल ब्युरो ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सने दिलेल्या माहितीनूसार पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या सर्व क्रूड व्हरायटीवरील आयात शुल्क 31 मार्च 2022 पर्यंत रद्द करण्यात आले आहे. यामुळे कच्चे पाम तेल, कच्चे सोया तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल ह्यावरील आयात शुल्क 24.75 टक्क्यांवरून शून्यावर आणले जाईल. तथापि, रिफाइन्ड सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील शुल्क अजूनही कायम आहे.

खाद्यतेलाच्या आयात शुल्कात जूनमध्ये प्रथम कपात करण्यात आली होती. त्यानंतर, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील कपात करण्यात आली होती. मात्र तरीही किरकोळ बाजारात किमती वाढतच राहिल्या. परिणामी, शुल्क कपात समाप्त करण्याची कट ऑफ तारीख, 30 सप्टेंबर पर्यंत वाढवावी लागेल, असे अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.

नोव्हेंबरमध्ये आणखी दोन वेळा शुल्क कपातीची घोषणा केली जाईल असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनुसार सरकारने सध्याच्या किंमती आणि पुरवठा ट्रेंडवर आधारित आणखी दोन कपातीसाठी पुरेसा वाव ठेवला आहे. किमती कमी करण्याच्या धोरणामुळे या वर्षाच्या सुरुवातीला या वस्तूंवर लावण्यात आलेला अतिरिक्त कृषी उपकरही माफ केला गेला आहे. ‘कृषी पायाभूत सुविधा आणि डेव्हलपमेंट सेस’ (एआयडीसी), अर्थसंकल्पात मांडण्यात आले होते आणि फेब्रुवारी 2021 पासून लागू करण्यात आले आहेत. एआयडीसी आकारण्याचा मुख्य हेतू कृषी क्षेत्रांत पायाभूत सुविधा आणि वित्तपुरवठा करणे हा आहे. याचा शुल्क कपातीत फायदा होऊ शकतो.

यामध्ये फळे, कडधान्य, कोळसा, कापूस, खते, सोने, चांदी इत्यादी वस्तूंच्या आयातीचा समावेश आहे. पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या उत्पादनावर अतिरिक्त शुल्क म्हणून अतिरिक्त सेस देखील आकारला जातो. या उत्पादनांच्या आयातीवर 31 मार्च 2022 पर्यंत सेस आकारला जाणार नाही.

Comments are closed.