निर्यात क्षमता वाढली! भारतीय सीफूड उद्योगाची भरभराट

अमेरिकेत वाढलेली मागणी आणि 2021 च्या पहिल्या सहामाहीत व्हॅनामेइ कोळंबीचे विक्रमी उत्पादन, ब्लॅक टायगर कोळंबी ब्रूडस्टॉकचे वाढलेले उत्पादन या गोष्टींमुळे भारतीय सीफूड उद्योग ह्या आर्थिक वर्षात निर्यातीत 7 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याची शक्यता वाढली आहे. कोविडमुळे शिपमेंटमध्ये अडथळा आल्याने देशातून सीफूडची निर्यात आर्थिक वर्ष 21 मध्ये सुमारे 11 टक्क्यांनी घटून 5.96 अब्ज डॉलरवर आली होती. तथापि, गेल्या काही महिन्यांत भारतीय सीफूडसाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या अमेरिकेत मागणी वाढली आहे. (Seafood exports from India may cross $7 billion)

शिपिंग कंटेनरची कमतरता आणि मालवाहतूक दर जास्त असूनही, सीफूड उद्योग केंद्राने ठरवलेले निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष जगदीश फोफंदी म्हणाले, “आम्हाला वाणिज्य मंत्रालयाने FY22 मध्ये निर्यात 31 टक्क्यांनी वाढवून 7.8 अब्ज डॉलर करण्यास सांगितले आहे. सध्या बाजारात चांगली मागणी आहे आणि मालाचे दरही वाढते आहेत. अमेरिकेत देखील मजबूत मागणी आहे, तर कोविड प्रोटोकॉल असूनही चीनमध्ये देखील मागणी वाढली आहे.”

सोसायटी ऑफ एक्वाकल्चर प्रोफेशनल्सचे माजी अध्यक्ष रवी कुमार येलेन्की म्हणाले, “मत्स्यपालन करणाऱ्या शेतकर्‍यांनी यावर्षी व्हॅनामेइचे अधिक उत्पादन केले आहे. “2021 च्या पहिल्या सहा महिन्यांत 3.28 लाख टनांचे विक्रमी उत्पादन झाले. हे 2018 च्या पहिल्या सहामाहीत केलेल्या उत्पादनापेक्षा जास्त आहे, जे आतापर्यंतचे सर्वोत्तम आहे.”एका दशकापूर्वी व्हॅनामेइ कोळंबीच्या आगमनापूर्वी, ब्लॅक टायगर कोळंबीने भारताच्या सीफूड निर्यातीवर वर्चस्व गाजवले होते. ब्लॅक टायगर कोळंबीचा वाटा आता 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.

यूएस आणि मादागास्करमधील दोन पुरवठादारांकडून स्पेसिफिक पॅथोजेन फ्री (एसपीएफ) ब्लॅक टायगर कोळंबी ब्रूडस्टॉक आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे निर्यातीत याचा वाटा वाढू शकतो.अमेरिकेत वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. “आता, रेस्टॉरंट्स उघडली आहेत. त्याचबरोबर लोकांना घरी कोळंबी खाण्याची सवय झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत मागणी बरीच वाढली आहे.”, येलेन्की म्हणाले.

शेतकऱ्यांना बियाणे पुरवण्यासाठी भारत अमेरिकेतून 90 टक्के व्हॅनामेइ ब्रूडस्टॉक आयात करतो. ऑल इंडिया श्रीम्प हॅचरीज असोसिएशनचे अध्यक्ष डी रामराज म्हणाले, “आयात आर्थिक वर्ष 21 मध्ये 2.5 लाखांहून अधिक पातळीवर पोहोचली आहे.”

जून आणि जुलैमध्ये विक्रमी निर्यात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. “अमेरिकेत निर्यात या वर्षी 35-40 टक्क्यांनी वाढली आहे. आणि बहुतेक निर्यातदारांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांत त्यांची एकूण निर्यात पूर्ण केली आहे.” असे पेनवर प्रॉडक्टस लिमिटेडचे सीएमडी फिलिप थॉमस यांनी सांगितले.

परंतु आंध्र प्रदेशातील शेतांमध्ये उत्पादन केल्या जाणाऱ्या कोळंबीवर मोठ्या प्रमाणावर होणारे रोग, हे चिंतेचे कारण आहे. तेथे देशातील जवळपास 70 टक्के कोळंबीचे उत्पादन होते. यामुळे डिसेंबर-जानेवारी कालावधीत व्हॅनामेइ कोळंबीचे उत्पादन कमी होईल असा अंदाज आहे.

“आम्हाला उत्तरार्धात कमी उत्पादन अपेक्षित आहे. एकूणच, आम्ही 7 लाख टन उत्पादन निर्माण करु शकतो, जे 2020 च्या उत्पादनापेक्षा जास्त आहे परंतु 2019 पेक्षा कमी आहे.” असे येलेन्की यांनी सांगितले. 2019 मध्ये देशात 8 लाख टन मत्स्यपालन कोळंबीचे विक्रमी उत्पादन झाले.दरम्यान एसपीएफ ब्लॅक टायगर कोळंबी ब्रूडस्टॉक भारतात आयात केल्याने याची भरपाई मोठ्या प्रमाणात होऊ शकते. व्हॅनामेइच्या तुलनेत, टायगर कोळंबीचे उत्पादन मोठ्या आकारात केली जाऊ शकते आणि त्यामुळे तीला चांगले दर मिळू शकतात, असेही ते म्हणाले.

Comments are closed.