SBI YONO चा वापर करून गोल्ड लोनला कसे अप्लाय कराल?

SBI Offers Gold Loan at Low Interest Rate, customers applying through its YONO app are also eligible to get an additional concession of 0.75 per cent for application before September 20, 2021.

जेव्हा बँकेकडून कर्ज घेण्याची गरज भासते, तेव्हा ‘गोल्ड लोन’ हा पर्यायदेखील उपलब्ध असतो. जर तुम्ही गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सारख्या बँकांकडून त्याचा लाभ घेऊ शकता.सोन्याचे दागिने गहाण ठेवून बँकांकडून गोल्ड लोन मिळू शकते.

एसबीआयने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, YONO प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही गोल्ड लोन घेऊ शकता. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ७.५% व्याज दराने तुम्ही हे गोल्ड लोन मिळवू शकता, जे आधीच्या व्याजदरापेक्षा ०.७५% सवलतीमध्ये आहे.

YONO द्वारे कर्ज मिळवण्याच्या पायऱ्या
१) कर्जासाठी अर्ज करा

अ. आपल्या YONO खात्यात लॉग इन करा
ब. होम स्क्रीनवर, वरच्या डाव्या बाजूला असलेल्या मेनू वर क्लिक करा.
क. लोन्सवर क्लिक करा
ड. गोल्ड लोन क्लिक करा.
इ.”apply now” वर क्लिक करा.
ई. दागिन्यांचे तपशील आणि स्वतःची माहिती भरा. (निवासी प्रकार, व्यवसाय प्रकार) आणि सबमिट करा

२) सोन्याच्या दागिन्यांसह एसबीआय शाखेला भेट द्या. जाताना तुमचे २ फोटो आणि केवायसी डॉक्युमेंट्स सोबत ठेवा.

३) बँकेत कर्जाच्या कागदपत्रांवर सही करा.

४) कर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला पैसे मिळतील.

एसबीआय गोल्ड लोन कोण घेऊ शकतो?
१)१८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्याचे उत्पन्नाचे काही स्त्रोत आहेत.
२)निवृत्तीवेतनधारक (उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही)

कर्ज प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१) फोटोच्या दोन प्रतींसह गोल्ड लोन साठीचा अर्ज
२)पत्त्याच्या पुराव्यासह ओळखीचा पुरावा

इतर मुद्दे
१)कर्जाची रक्कम:
किमान: २०,००० रुपये
कमाल: ५० लाख रुपये
२)मार्जिन: २५% (बुलेट रीपेमेंट गोल्ड लोन च्या बाबतीत ३५%)
३)कर्जाचा कालावधी: ३६ महिने (बुलेट रीपेमेंट गोल्ड लोन च्या बाबतीत १२ महिने)
४) फोरक्लोजर फी: बँकेने ग्राहकांना फोरक्लोजर शुल्क आणि प्री पेमेंट पेनल्टी माफ केली आहे.

YONO प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, कोणीही इतर शाखांमधून एसबीआय गोल्ड लोन घेऊ शकतो.

Comments are closed.