गॅस डिस्ट्रिब्युशन प्रोजेक्टमध्ये इंडियन ऑईल गुंतवणार तब्बल ‘इतके’ कोटी

देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने सिटी गॅस वितरणामध्ये 7000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या गुंतवणुकीची माहिती शहर गॅस वितरण नेटवर्क उभारण्यासाठी बोलीच्या ताज्या फेरीत जिंकलेल्या परवान्यांतर्गत दिली आहे. IOC ने माहिती दिली की CGD बोलीच्या नुकत्याच संपलेल्या 11 व्या फेरीत, कंपनीने एकूण मागणी क्षमतेच्या 33 टक्के हिस्सा मिळवला आहे. हा भाग जम्मूपासून मदुराई आणि हल्दियापर्यंत पसरलेला आहे. 

सिटी गॅस वितरण बिडिंगच्या 11व्या फेरीत, इंडियन ऑइलने वाहनांसाठी किरकोळ CNG आणि घरांना पाईप LPG साठी 9 परवाने जिंकले आहेत. इंडियन ऑइल कंपनीला इतर दोन कंपन्यांच्या तुलनेत कमी परवाने मिळाले असले तरी ते क्षमतेच्या दृष्टीने खूपच जास्त आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) व्यतिरिक्त, मेघा इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला 15 परवाने मिळाले आहेत आणि अदानी टोटल गॅस लिमिटेडला 14 परवाने मिळाले आहेत. तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला 9 परवाने मिळाले आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने एका निवेदनात म्हटले आहे की कंपनी नवीन शहर गॅस वितरण प्रकल्पांमध्ये 7000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करेल. ही रक्कम CGD विभागासाठी आधीच प्रस्तावित केलेल्या 20000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त आहे.

Comments are closed.