IRCTC भारतात पहिल्यांदाच आणतेय कॉर्डेलिया क्रूझ!

IRCTC will start India's first indigenous cruise liner from 18 September.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) १८ सप्टेंबरपासून भारतातील पहिले स्वदेशी क्रूझ लाइनर सुरू करेल, असे रेल्वे पीएसयूने सांगितले.

कॉर्डेलिया क्रूझ या खाजगी कंपनीशी करार करून IRCTC १८ सप्टेंबरपासून पहिली क्रूझ सुरू करेल ज्यासाठी IRCTC च्या वेबसाइट http://www.irctctourism.com वर बुकिंग करता येईल .

पीएसयूने एका निवेदनात म्हटले आहे, “भारतातील पहिल्या स्वदेशी लक्झरी क्रूझच्या मार्केटिंगसाठी IRCTC ने मेसर्स वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेड द्वारे संचालित कॉर्डेलिया क्रूझेस सोबत करार केला आहे. IRCTC च्या पर्यटन सेवांमध्ये याद्वारे लक्झरी प्रवास ऑफर केला जाईल.

“कॉर्डेलिया क्रूझेस ही भारताची प्रीमियम क्रूझ लाइनर आहे. ती स्टायलिश, लक्सरियस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील क्रूझ संस्कृतीला प्रोत्साहन देईल.

आयआरसीटीसीने सांगितले की, गेस्ट ना गोवा, दीव, लक्षद्वीप, कोची आणि श्रीलंका सारख्या काही सर्वोत्तम भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्थळांवर प्रवास करण्याची ऑफर उपलब्ध असेल.

कॉर्डेलिया क्रूझ १८ सप्टेंबरपासून आपला प्रवास सुरू करत आहे आणि पहिल्या टप्प्यात मुंबईतून प्रवास करेल, तर नंतर मे २०२२ पासून क्रूझ चेन्नईला स्थलांतरित होईल आणि कोलंबो, गॅले,जाफना सारख्या श्रीलंकेच्या नयनरम्य ठिकाणाकडे रवाना होईल.

कॉर्डेलिया क्रूझच्या काही लोकप्रिय टूर प्रवासामध्ये मुंबई-गोवा-मुंबई, मुंबई-दीव-मुंबई, मुंबई-समुद्र-मुंबई, कोची-लक्षद्वीप समुद्र मुंबई, मुंबई समुद्र लक्षद्वीप इ ठिकाणाचा समावेश आहे.

“कॉर्डेलिया क्रूझमध्ये प्रवास करताना एखादी व्यक्ती रेस्टॉरंट्स, स्विमिंग पूल, बार, ओपन सिनेमा, थिएटर, किड्स एरिया, व्यायामशाळा यासारख्या मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेऊ शकते.”

कोविड प्रोटोकॉलनुसार क्रू मेंबर्सचे पूर्णपणे लसीकरण केले जाईल आणि दररोज आरोग्यतपासणी,सॅनिटायझेशन, एअर फिल्टरेशन आणि सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले जाईल.

सरकारच्या अधिकृत आदेशानुसार गेस्टची संख्या देखील मर्यादित असेल.

क्रूजवर सर्व आवश्यक वैद्यकीय अत्यावश्यक वस्तूंनी सुसज्ज असलेले एक पूर्णपणे कार्यरत वैद्यकीय केंद्र देखील उपलब्ध असेल.

भारतातील लक्झरी क्रूझ व्यतिरिक्त IRCTC सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रूझ लाइनर्ससोबत करार करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि कोविड परिस्थिती सामान्य झाल्यावर आंतरराष्ट्रीय क्रूझने त्यांचे कामकाज सुरू करताच त्यांच्या वेब पोर्टलवर बुकिंग सुरु केली जाईल.

Comments are closed.