गुंतवणूकदारानो ITC बाबत ‘ही’ अपडेट वाचली का? शेअर्सवर होऊ शकतो परिणाम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ITC इन्फोटेकच्या डीमर्जरवर विचार करण्यासाठी ITC चे बोर्ड लवकरच बैठक घेणार आहे. कंपनी आपल्या IT व्यवसायाचे डिमर्जर पर्याय शोधण्यासाठी बँकर्स देखील नियुक्त करण्याची शक्यता आहे.

ITC शेअरबाबत येणारी कोणतीही बातमी असो, गुंतवणूकदारांना त्याबाबत एक विलक्षण आस असते. अशीच एक महत्वाची अपडेट काही आघाडीच्या वाहिन्यांनी दिली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ITC इन्फोटेकच्या डीमर्जरवर विचार करण्यासाठी ITC चे बोर्ड लवकरच बैठक घेणार आहे. कंपनी आपल्या IT व्यवसायाचे म्हणजेच ITC Infotech करीता डिमर्जर पर्याय शोधण्यासाठी बँकर्स देखील नियुक्त करण्याची शक्यता आहे.

 

IT डिमर्जरसाठी कंपनीचे एकूण मूल्य 20,000-25,000 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.  ITC Infotech बँकिंग आणि वित्तीय सेवा, आरोग्यसेवा, उत्पादन, ग्राहकोपयोगी वस्तू आणि हॉस्पिटॅलिटी यासारख्या उद्योगांमधील उपक्रमांना तंत्रज्ञान सेवा देते. ITC च्या पूर्ण मालकीच्या या उपकंपनीने अलीकडेच हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील असोसिएट प्रोफेसर, पृथ्वीराज चौधरी यांच्यासमवेत प्रोडक्शन फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलसोबत सहकार्य करण्याची घोषणा केली आहे.

आयटीसीकडून मात्र अजूनही याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

Comments are closed.