गो फॅशनचा IPO आज मार्केटमध्ये, पहिल्या दिवशीच गुंतवणूकदारांची पसंती

गो फॅशनचा तीन दिवसीय IPO आज सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. 22 नोव्हेंबर रोजी तो बंद होईल. IPO साठी किंमत बँड 655-690 प्रति शेअर निश्चित केला आहे. गो कलर्स या महिलांच्या बॉटमवेअर ब्रँडची मालकी असलेल्या गो फॅशन (इंडिया) लिमिटेडच्या पब्लिक इश्यूला किरकोळ गुंतवणूकदारांनी ओपनिंगच्या काही मिनिटांतच ओव्हरसबस्क्राइब केले.

गो फॅशनचा IPO आज बाजारात दाखल झाला आहे. IPO ने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. तीन दिवसीय IPO आज सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. 22 नोव्हेंबर रोजी तो बंद होईल. IPO साठी किंमत बँड 655-690 प्रति शेअर निश्चित केला आहे.गो कलर्स या महिलांच्या वेअर ब्रँडची मालकी असलेल्या गो फॅशन (इंडिया) लिमिटेडच्या पब्लिक इश्यूला किरकोळ गुंतवणूकदारांनी ओपनिंगच्या काही मिनिटांतच ओव्हरसबस्क्राइब केले.

 

ऑफरच्या पहिल्या दिवशी दुपारी 12:15 वाजेपर्यंत, गो फॅशन IPO 1.13 पट ओव्हरसबस्क्राइब झाला आहे, ज्यामध्ये किरकोळ भाग 6 पट बुक केला गेला आहे आणि NII ने 0.14 पट बोली लावली आहे. IPO मध्ये 125 कोटी पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि प्रमोटर्स आणि विद्यमान शेअरहोल्डरद्वारे 12,878,389 इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर समाविष्ट आहे. प्राइस बँडव्दारे IPO ला 1,013.6 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. बाजार निरीक्षकांच्या मते, गो फॅशन शेअर्स प्रीमियम (GMP) आज ग्रे मार्केटमध्ये 535 वर पोहोचला आहे. कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2021 रोजी स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE वर लिस्टिंग होण्याची अपेक्षा आहे.

 

शेअरइंडियाचे संशोधन प्रमुख आणि उपाध्यक्ष रवी सिंग म्हणाले, “सध्याच्या बाजारपेठेच्या परिस्थितीत, बहुतेक IPO ची कामगिरी चांगली होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही गो फॅशन IPO ला देखील लिस्टिंग दरम्यान चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा करतो.

गो फॅशन 30 सप्टेंबर 2021 पर्यंत भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 459 EBOS (एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स) च्या विस्तृत नेटवर्कद्वारे प्रामुख्याने ग्राहकांना सेवा देते.

Comments are closed.