टार्सन्स प्रॉडक्टसच्या आयपीओला भरभरून प्रतिसाद, अखेरच्या दिवशी ‘इतके’ सबस्क्रिप्शन – वाचा सविस्तर

लॅबवेअर वस्तूंचे निर्माते असलेल्या टार्सन्स प्रॉडक्टच्या IPO मधून शेअर्स विक्रीने 17 नोव्हेंबर रोजी बोली लावण्याच्या अंतिम दिवशी 77 पट सबस्क्रिप्शन मिळवले. IPO साठी 1.08 कोटी युनिट्सच्या ऑफर साइज विरुद्ध 83.54 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लागली.

लॅबवेअर वस्तूंचे निर्माते असलेल्या टार्सन्स प्रॉडक्टच्या IPO मधून शेअर्स विक्रीने 17 नोव्हेंबर रोजी बोली लावण्याच्या अंतिम दिवशी 77 पट सबस्क्रिप्शन मिळवले. IPO साठी 1.08 कोटी युनिट्सच्या ऑफर साइज विरुद्ध 83.54 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लागली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव भाग 10.16 पट आणि कर्मचार्‍यांसाठी 1.87 पटीने सबस्क्राईब झाला. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 60,000 इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहेत.

 

पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या भागाच्या 116 पट शेअर्स खरेदी केले आहेत आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या भागाच्या 183.4 पट बोली लावली. कंपनीने 15 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी ऑफर लाँच केली, ज्यामध्ये 150 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि स्टेकची विक्री करून 1.32 कोटी इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे.

 

सदर शेअर विक्रीतून कंपनीला 1,023.84 कोटी मिळण्याची शक्यता आहे. शेअर विक्रीमध्ये 635-662 रुपये प्राइस बँड असण्याची शक्यता आहे. टार्सन्स प्रॉडक्ट ही एक भारतीय लॅबवेअर कंपनी आहे, जी बेंच-टॉप उपकरणांसह वापरण्यायोग्य वस्तू, पुन्हा वापरता येण्याजोग्या वस्तूंचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि विपणनामध्ये गुंतलेली आहे. भारतीय रासायनिक तंत्रज्ञान संस्था, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, डॉ रेड्डीज प्रयोगशाळा यासाठी कंपनी काम पाहते.

Comments are closed.