पेटीएमचा IPO ग्रे मार्केटमध्ये जरासा खालावला, होऊ शकतो लिस्टिंगवर परिणाम

सर्वात मोठा IPO म्हणून गाजलेला पेटीएम IPO ग्रे मार्केटमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान IPO ला ग्रे मार्केटमध्ये थोडासा थंड प्रतिसाद मिळत आहे.

सर्वात मोठा IPO म्हणून गाजलेला पेटीएम IPO ग्रे मार्केटमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान IPO ला ग्रे मार्केटमध्ये थोडासा थंड प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये कमी प्रीमियमवर ट्रेड करतात. शेअर्स BSE किंवा NSE येण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये दाखल होत असतात.

 

Paytm IPO चे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रत्येकी 2,180 वर ट्रेडिंग करत होते. IPO वॉच आणि IPO सेंट्रल नुसार सदर IPO 2,150 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. पेटीएम IPO जसजसा लिस्टिंग दिवस जवळ येत आहे, तसतसा हा प्रीमियम हळूहळू कमी होत आहे. 7 नोव्हेंबर रोजी ग्रे मार्केटमध्ये शेअर 2,300 रुपये प्रति शेअरवर ट्रेडिंग करत होता. इश्यू किमतीच्या तुलनेत 150 रुपये किंवा 7 टक्के प्रीमियम होता.

 

कॅपिटलविया ग्लोबल रिसर्चचे प्रमुख गौरव गर्ग म्हणाले, “आम्ही ग्रे मार्केट प्रीमियममध्ये IPO सातत्याने घसरत असल्याचे पाहिले आहे. माझ्या मते, GMP ची घसरण झाली त्यामुळे IPO ला इतका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून IPO कडून अपेक्षा उंचावल्या होत्या.”

पेटीएमने 18,300 कोटी रुपयांचा देशातील सर्वात मोठा पब्लिक इश्यू लाँच केला आहे. 18 नोव्हेंबर रोजी IPO उपलब्ध होणार आहे. 2021 मध्ये ही 49 वी लिस्टिंग असेल. या ऑफरमध्ये संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्यासह अनेक स्टेकहोल्डरनी 8,300 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 10,000 कोटी रुपयांच्या विक्रीची ऑफर समाविष्ट केली होती.

या ऑफरला गुंतवणूकदारांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आणि IPO, 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान 1.89 पट सबस्क्राईब झाला.

Comments are closed.