जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन मधे असतील हे फिचर्स
JioPhone Next specifications leaked ahead of september launch. Here is what to expect from the upcoming smartphone by Jio.
रिलायन्स इंडस्ट्रीजने “जिओफोन नेक्स्ट” हा स्मार्टफोन लाँच करण्याची माहिती दिली होती. परंतू कंपनीने फीचर्स किंवा किंमत याबाबत कोणतीही माहिती जाहीर केली नव्हती. पण अधिकृत अनावरण होण्यापूर्वीच फोनची काही फीचर्स लीक झाली आहेत,जे गुगल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकत्रित प्रॉडक्ट आहे.
स्मार्टफोनवरील नवीन ऑपरेटिंग सिस्टम तसेच प्रोसेसर, डिस्प्ले रिझोल्यूशन सह काही फीचर्स लीक झाली आहेत. जिओफोन नेक्स्ट बद्दल XDA डेव्हलपर्सचे मुख्य संपादक मिशाल रहमान यांच्याकडून माहिती लीक झाली आहे.
रहमान यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला होता,ज्यात स्क्रीनवर “जिओफोन नेक्स्ट क्रिएट विथ गुगल” असे म्हटले आहे जे सामान्य अँड्रॉइड च्या तुलनेत पूर्णपणे भिन्न आहे.
स्पेसिफिकेशनच्या बाबतीत, रिलायन्स जिओ स्मार्टफोनवर HD+ डिस्प्ले देईल. डिव्हाइस मधे ६४-बिट क्वाड-कोर क्वालकॉम QM२१५ चिपसेट द्वारे समाविष्ट असेल. चिप, क्वालकॉम एड्रेनो ३०८ GPU सह जोडली गेलेली आहे. चिप इन्टीग्रेटेड X5-LTE मॉडेमसह उपलब्ध आहे .
इतर फीचर्स मधे, स्मार्टफोनमध्ये जीपीएस, ईएमएमसी ४.५ स्टोरेज आणि ब्लूटूथ ४.२ उपलब्ध होतील.
ऑप्टिक्सच्या बाबतीत, जिओफोन नेक्स्ट मधे सिंगल-लेन्स कॅमेरा सेटअप असेल .सिंगल-लेन्स साठी १३ MP सेंसर येईल.तर फ्रंट कॅमेरा ८ MP रिझोल्यूशनचा असेल.
किंमतीच्या बाबतीत स्पष्टता नसली तरी रिलायन्सने जाहीर केले होते की, हा फोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. रहमान यांच्यानुसार रिलायन्स त्याची किंमत ३,७०० रु च्या दरम्यान ठेवेल.
Comments are closed.