व्होडाफोन आयडियाचा स्टॉक घेतलाय? एकदा कंपनीचा लॉससुद्धा बघून घ्या

The revenue from operations of VI declined by 14%

शनिवार १४ ऑगस्ट रोजी वोडाफोन आयडिया (Vi) ने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीला ७३९१.१ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे स्पष्ट केले आहे तर डेट १.९१ लाख कोटींवर गेले आहे.

यामध्ये जवळपास १.०६ लाख कोटी रुपयांपर्यंतचे स्थगित स्पेक्ट्रम पेमेंट, एजीआरसाठीचे ६२१८ कोटी आणि सरकार व बँका यांच्याकडून घेतलेले एकूण २३४० कोटींचे कर्ज यांचा समावेश आहे.

Vi ने आपल्या त्रैमासिक अहवालात (एप्रिल-जून २०२१) म्हटले आहे की, कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन/निर्बंधांमुळे महसूल ४.७ टक्क्यांनी घटून ९१५० कोटी रुपये झाला आहे. या अहवालानुसार,EBITDA रु. ३७१० कोटी, तर EBITDA मार्जिन ४०.५ टक्के आहे. याआधीच्या तिमाहीत हेच मार्जिन ४५.९% टक्के होते.

वोडाफोन आयडिया लिमिटेडचे ​​एमडी आणि सीईओ रवींद्र ठक्कर म्हणाले की, “कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थचक्रावर बराच परिणाम झाला. परंतु आम्ही ग्राहकांस उत्तम सेवा देऊ केली. डेटा आणि व्हॉईस, तसेच इतर सुविधांत आम्ही अग्रस्थानी होतो.आम्ही आमच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा नेहमी प्रयत्न करत आहोत आणि विविध
योजना अंमलात आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. तसेच आम्ही निधी उभारणीसाठी, आमचा धोरणात्मक हेतू साध्य करण्यासाठी गुंतवणूकदारांशी सुद्धा सक्रिय चर्चा करत आहोत.”

Comments are closed.