मल्ल्या भारतात येवो न येवो, किंगफिशर हाऊस मात्र विकले…

The Kingfisher House was sold at just Rs 52 crore to a Hyderabad-based firm Saturn Realtors

विजय मल्ल्याच्या मालकीचे आणि आता बंद पडलेले किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्यालय कर्जदारांनी अखेर विकले आहे. हैदराबादच्या एका खाजगी डेव्हलपरने 52 कोटी रुपयांना हे घर विकत घेतले आहे.

सॅटर्न रियल्टर्सने एकूण मूळ किंमतीच्या तुलनेत अगदी कमी पैसे मोजत हे मुख्यालय खरेदी केले असे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.यापूर्वी अनेक प्रयत्न करूनही किंगफिशर हाऊस घेण्यास खरेदीदार सापडत नव्हता.

रिअल इस्टेट उद्योग तज्ज्ञांच्या अहवालानुसार,एकूणच या जागेच्या अनेक मर्यादा होत्या. शिवाय तिथे आणखी काही डेव्हलपमेंट करण्यासही वाव नव्हता. मुंबई एअरपोर्टजवळील विलेपार्ले भागात ही मालमत्ता आहे.

कर्जदारांनी मार्च 2016 मध्ये पहिल्यांदा 150 कोटी रुपयांच्या किमतीसह मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, मालमत्तेचा लिलाव करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले परंतु ते अयशस्वी झाले.

मल्ल्याला विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आले आहे. 26 जुलै रोजी ब्रिटीश न्यायालयाने मल्ल्याविरोधात दिवाळखोरीचा आदेश दिला. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमचा मल्ल्याची खाती गोठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments are closed.