Tracxn टेक्नॉलॉजी घेऊन येतेय आयपीओ… मात्र फ्लिपकार्टचे फाउंडर १२ लाख शेअर्स विकून पडणार बाहेर

Market Intelligence Platform Tracxn Technologies has filed papers with SEBI to raise funds through an IPO.

ॲनालिटिक्स फर्म Tracxn Technologies ने पब्लिक इश्यू द्वारे फंड उभारण्यासाठी सेबीकडे DRHP दाखल केली आहे. या निर्णयामुळे एक्सेल इंडिया, एससीआय इन्व्हेस्टमेंट,सचिन व बिन्नी बन्सल यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे .ह्या इश्यू मध्ये ३८,६७२,२०८ इक्विटी शेअर्सची विक्री होणार असून पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे ती केली जाईल.

प्रमोटर्सअभिषेक गोयल आणि नेहा सिंग ऑफर फॉर सेलद्वारे प्रत्येकी ७६,६२,६५५ इक्विटी शेअर्स विकतील. फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल प्रत्येकी १२,६३,०९६ इक्विटी शेअर विकून Tracxn मधून बाहेर पडतील.

खाजगी इक्विटी फंड एक्सेल इंडिया आणि व्हेंचर कॅपिटल फंड सिकोइया कॅपिटल इंडिया कंपनीमधून अनुक्रमे ४०,१७,५०६ इक्विटी शेअर्स आणि २१,८१,६९२ इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करतील.

इतर गुंतवणूकदारांमध्ये, साहिल बारुआ २,०७,५४८ इक्विटी शेअर्स, दीपक सिंह ३,१५,७७४ इक्विटी शेअर्स, कोल्लूरी लिव्हिंग ट्रस्ट २,६७,९१५ इक्विटी शेअर्स आणि रत्नागिरीश मथरुबुथम २,९५,९५२ इक्विटी शेअर्सची विक्री करतील. एनआरजेएन फॅमिली ट्रस्ट, डब्ल्यूजीजी इंटरनॅशनल आणि प्रशांत चंद्रा अनुक्रमे ५,९१,९०४ इक्विटी शेअर्स, ८,८१,६०२ इक्विटी शेअर्स आणि ६,३६,००० इक्विटी शेअर्स विकतील.

उद्योजक आणि प्रवर्तक अभिषेक गोयल आणि नेहा सिंग यांच्याकडे Tracxn मध्ये प्रत्येकी २४ टक्के हिस्सा आहे, तर गुंतवणूकदारांमध्ये एलिव्हेशन कॅपिटलकडे २०.६४ टक्के तर सीब्राइट लिमिटेडकडे ४ टक्के हिस्सा आहे.

नेहा सिंग या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक तर ,अभिषेक गोयल हे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक आहेत. रतन टाटा, एनआरजेएन फॅमिली ट्रस्ट, नीरज अरोरा, सचिन बंसल, बिन्नी बन्सल, अमित रंजन, गिरीश मथरुबुथम, आनंद राजारामन, अमित सिंघल आणि आशिष गुप्ता यासारख्या नामांकित लोकांची कंपनीत गुंतवणूक आहे.

Tracxn ही जागतिक बाजारपेठेत प्रसिद्ध पुरवठादारांपैकी एक आहे आणि डेटा ऑफर करणाऱ्या कंपन्यांमध्ये जागतिक स्तरावर पहिल्या पाच मध्ये स्थान मिळवते.

आयओटी, आर्टिफिशियल इन्टेलीजन्स, व्हर्च्युअल रिऍलिटी, रोबोटिक्स, ब्लॉकचेन आणि इलेक्ट्रिक वाहने यासह तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनीचे मोठे नाव आहे.

मार्च २०२१ पर्यंत कंपनीचे ५० पेक्षा जास्त देशांमध्ये ८५५ ग्राहक तर एकून २,३५८ वापरकर्ते आहेत. ग्राहकांमध्ये फॉर्च्युन ५०० मधील कंपन्यांचा समावेश आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीजची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Comments are closed.