इतिहासात पहिल्यांदा असे होणार का? एलआयसी आयपीओसाठी मोठा निर्णय घेणार का?

LIC may split its IPO into two parts with a gap of a few months.

एलआयसी आयपीओ द्वारे सरकार, सुमारे १ लाख कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. मात्र आता हा आयपीओ दोन ऑफरमध्ये विभागला जाऊ शकतो.

जर असे झाले, तर भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात ती पहिली अशी घटना असेल. सेबीच्या नियमांनुसार प्रमोटर आयपीओपासून १८ महिन्यांच्या आत आपला हिस्सा २०% पेक्षा कमी करू शकत नाहीत. ज्या कंपनीचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपये आहे, अशा कंपनीत होल्डिंग १०% पर्यंत कमी करण्यासाठी प्रमोटर्सला दोन वर्षे लागू शकतात.

एलआयसीसाठी गुंतवणूकीकरता अनेक पर्यायांबद्दल बोलले जात आहे त्यामध्ये कॉर्नरस्टोन गुंतवणूकदार, मार्की ॲसेट मॅनेजर आहेत जे आयपीओसाठी जास्त निधी उपलब्ध करुन देऊ शकतात. सामान्यतः सरकारी मालकीच्या कंपन्या ऑफर अगोदर गुंतवणूकदारांबरोबर कोणत्याही प्रकारच्या शेअर प्लेसमेंटसाठी चर्चा करत नाही.

सूत्रांनुसार, आयपीओ प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की एलआयसीचा आयपीओ बाजारात येईपर्यंत बरेच आयपीओ येणार आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा निधी मोठ्या प्रमाणात गुंतवला गेलेला असेल.

आतापर्यंत २०२१ मध्ये, २५ हून अधिक IPO ने जवळपास ७०,००० कोटी रुपये मिळवले आहेत. पेटीयमने, सुमारे १६,६०० कोटी रुपयांच्या IPO साठी तयारी केली आहे. यामुळे पेटीएम IPO सर्वात मोठा होईल. २०१० मध्ये कोल इंडियाचा १५,४७५ कोटी रुपयांचा आयपीओ सर्वात मोठा होता .

Comments are closed.